Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महालक्ष्मी विद्यालयातील ग्रंथालयासाठी काळखैर कुटुंबाकडून मदत

अकोले ः माणसाच्या जीवनात वाचलेली पुस्तके व भेटलेली माणसे काहीतरी शिकून जातात. या भावनेने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त अभियंते महेंद्र काळखैर

मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही : ना बाळासाहेब थोरात
शारदा शैक्षणिक संकुलाची उज्वल यशाची परंपरा कायम
ओबीसींचा प्रश्न निकाली काढा, अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा.. चिंतन बैठकीत इशारा l Lok News24

अकोले ः माणसाच्या जीवनात वाचलेली पुस्तके व भेटलेली माणसे काहीतरी शिकून जातात. या भावनेने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त अभियंते महेंद्र काळखैर व त्यांचे सुपुत्र राहुल काळखैर यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी पंन्नास हजार रुपयांची देणगी दिली.
याप्रसंगी संस्थेचे सचिव मंगेशराव नवले, प्राचार्य सुनील धुमाळ, अहमदनगर शिक्षक बँकेचे संचालक अण्णासाहेब ढगे, राज्य क्रीडापंच अनिल चासकर, मारूती आभाळे,विठ्ठल आभाळे, तुकाराम भोर, रामनाथ पोखरकर यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आदिवासी दुर्गम व डोंगराळ भागातील या शाळेस संस्थेचे सचिव मंगेशराव नवले यांच्या माध्यमातून काळखैर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी तसेच आपले ज्ञान समृद्ध करण्यासाठी त्यांनी सामाजिकतेच्या भावनेतून ग्रंथालयास ही मदत दिली. शहरी भागातील विद्यार्थ्यांना या गोष्टी सहज उपलब्ध होतात मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपले ज्ञान समृद्ध करण्यासाठी वाचनाची पुस्तके बर्‍याच वेळा उपलब्ध नसतात या भावनेतून काळखैर कुटूंबीयांनी विद्यालयास ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी भरीव स्वरूपात मदत केली असल्याची माहीती प्राचार्य सुनिल धुमाळ यांनी दिली. यावेळी विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या देणगी बद्दल संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव मनकर, सचिव मंगेशराव नवले, ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मण सोंगाळ, उपसरपंच मारुती काळे, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मारुती आभाळे यांसह ग्रामस्थांनी महेंद्र काळखैर तसेच राहुल काळखैर यांचे आभार व्यक्त केले.

COMMENTS