Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खडकी आगीच्या दुर्घटनेतील कुटुंबीयांना मदत मिळवून द्या

आमदार आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना

कोपरगाव : कोपरगाव शहरातील उपनगरातील खडकी येथे गुरुवार (ता.2 मे) रोजी दुपारी 2.00  च्या सुमारास झालेल्या आगीच्या घटनेचा पंचनामा करून त्यांना शासना

शिर्डी विमानतळासाठी 876 कोटींच्या निधीस मान्यता
श्री साईगाव पालखी सोहळयासाठी आ. काळेंनी मागितली भिक्षा
सहा देवस्थानच्या 3 कोटीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी

कोपरगाव : कोपरगाव शहरातील उपनगरातील खडकी येथे गुरुवार (ता.2 मे) रोजी दुपारी 2.00  च्या सुमारास झालेल्या आगीच्या घटनेचा पंचनामा करून त्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळवून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या आहेत. कोपरगाव शहरातील खडकी येथील रहिवासी असणारे गणेश शिरसाठ यांच्या घराला गुरुवार (2 मे) रोजी लागलेल्या भिषण आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सदरची आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आग इतक्या मोठ्या प्रमाणात लागली होती की, शिरसाठ यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू बरोबरच दूरदर्शनसंचासह त्यांची दुचाकी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झालेली आहे. शिरसाठ कुटुंब घरी नसतांना हि आगीची घटना घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्यामुळे या कुटुंबापुढे मोठा अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे. सदरच्या घटनेची माहिती आ. आशुतोष काळे यांना मिळताच त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सदरच्या  घटनेचा तात्काळ पंचनामे करून शिरसाठ यांच्या कुटुंबाला मदत पुनर्वसन विभाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पुढील कारवाई लवकरात लवकर करावी याकरीता तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या आहेत.

COMMENTS