Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातबारा उताऱ्यावरील वारस नोंदी रखडल्या; जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची तहसीलदार, प्रांत अधिकाऱ्यांविषयी नाराजी

नाशिक प्रतिनिधी  - सातबारा उताऱ्यावरील वारसनोंदी,खरेदीच्या नोंदी, तक्रार नोंदी प्रलंबित आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या दैनंदिन कामांकडे व्यवस्

उमेदवारी अर्ज दाखल करताना घ्यावयाची दक्षता व आवश्यक तरतुदी
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोहीम स्तरावर प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी जलज शर्मा
पालखेड धरण व डावा कालवा बिगर सिंचन आवर्तनाची जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी भेट देवून केली पाहणी

नाशिक प्रतिनिधी  – सातबारा उताऱ्यावरील वारसनोंदी,खरेदीच्या नोंदी, तक्रार नोंदी प्रलंबित आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या दैनंदिन कामांकडे व्यवस्थित लक्ष देत नसल्यामुळे प्रलंबित नोंदीचे प्रमाण वाढत असल्याची नाराजी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त करत आचारसंहितेपूर्वी महसूल वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याची सूचना तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकारी शर्मा यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांची बुधवारी (ता.१८) बैठक घेत महसूली कामांचा आढावा घेतला.

या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा यांनी जमीन महसूल व गौण खनिज आढावा घेताना गत वर्षाच्या तुलनेत यंदा महसूल वसुली १० टक्के कमी झाली असल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेचा कालावधी लक्षात घेता आजच महसूल वसुलीकडे लक्ष देत दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ३१ ऑगस्ट अखेर अवघी ३४ टक्के महसूल वसुली असून निफाड सारख्या तालुक्यात ती अवघी १० टक्केच झाली आहे. त्यामुळे ज्या तालुक्यांची वसुली कमी आहे. त्या तालुक्यांच्या तहसिलदारांनी महसूल वसुलीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

ई-चावडी,डिजिटल क्रॉप सर्वे पीक पाहणी, नोंदणीकृत अनोंदणीकृत विवादग्रस्त व अविवादग्रस्त फेरफार नोंदी, ई-हक्क प्रणाली, सेवा हमी कायद्या अंतर्गत नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सेवांची सद्यःस्थिती, राज्य सेवा हमी आयोगाकडील अपिले, तलाठी कार्यालय इमारत बांधकाम आढावा, विधानसभा निवडणूक पूर्व तयारी व मतदार यादी, अखर्चित निधी, अपूर्ण कामे, आधार सीडिंग, जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले खाणपट्टे व वाळू डेपो या ठिकाणी बसवण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, शासकीय जमिनीवरील खाणपट्टे, पोटखराबा वर्ग जमिनीचे क्षेत्र लागवड, आस्थापनाविषयक बाबी आणि क व ड संवर्गातील कर्मचारी यांचे विभागीय चौकशीबाबत अशा जवळपास ५४ विषयांचा धावता आढावा जिल्हाधिकारी शर्मा यांनी घेतला.

COMMENTS