Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठवाडा, विदर्भात पावसाचा हाहाकार

नद्यांना पूर, अनेक जिल्ह्यात पिके पाण्याखाली

नागपूर/छ.संभाजीनगर : गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात पावसाने जोरदार धुमाकूळ घातल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक जिल्

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत दोन बिबट्यांचा वावर….. पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण LokNews24
सिल्लोड शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नगर परिषदच्या वतीने बाजार पेठेत दुकानावर कारवाई सुरू
औरंगाबादेत पावसाचा हाहाकार… जोरदार पावसाने झोडपले

नागपूर/छ.संभाजीनगर : गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात पावसाने जोरदार धुमाकूळ घातल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यात पिके पाण्याखाली गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिकांचा पंचनामा करून मदत करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. तर दुसरीकडे हिंगोल, नांदेड जिल्ह्यातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दोन दिवसांमुळे झालेल्या पावसामुळे नद्या, नाल्यांना पुर आला आहे. पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली आहे. तर शेती देखील पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. बुलडाणा, हिंगोली, परभणी व वाशिम जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला आहे. ,व्यारा बायपास मार्गावर पाणी भरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. नांदेड शहर व जिल्ह्यात रविवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी तासाभराच्या विश्रांतीनंतर पु्न्हा पावसाचा जोर वाढला. यामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी शिरले. शहरातील श्रावस्ती नगर, विष्णू नगर, गोकुळ नगर, हमालपुरा या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. पावसाचा जोर वाढल्याने नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होण्याचा धोका आहे. नांदेड जिल्ह्यतील लिंबोटी धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. मनार नदीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मनार नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे मनार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. परभणीत पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्यासाठी गेल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाशिम येथील शेलूबाजार परिसरातील कारंजा रोड येथील सेंट्रल बँक, स्टेट बँक एटीएम व येथील ग्रामपंचायतच्या गाळ्यांमध्येही पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे येथे असणार्‍या दुकानांमधील साहित्याचे नुकसान झाले.मराठवाड्यातील परभणी, नांदेड, बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात अकोली नदीला पूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या तालुक्यातील अकोली, भोसी, वरुड(नृ), बलसा, मालेगाव, पाचलेगाव, दगडचोप, चारठाणा आदि गावात पुराचे पाणी शेतात घुसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पुराचा सोयाबीन, कापूस, हळदीसह आदी पिकांना फटका बसला आहे. मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा यवतमाळ येथील पुलही पाण्याखाली गेला आहे. याचा परिणात या मार्गावरील वाहतूकीवर झाला आहे. पुलावरुन पाणी वाहत असताना कोणीही धोकायदायक प्रवास करु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात पापनशिणी नदीवरील पूल गेला वाहून – बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे परळी-बीड मार्गावरील पापनाशिणी नदीवर पूल वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. येथील शिवाय वाण-वाप नदीच्या पुलावर देखील पाणी साचले आहे. पावसामुळे परळीहून बीड कडे जाणारी वाहतूक नागापूरहून शिरसाळाच्या दिशेने वळवली आहे.

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने पूरस्थिती – नादेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. किनवट तालुक्यात 136 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सिंदगी, उमरी बाजार व किनवट या मंडळात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. किनवटसोबतच हिमायतनगर, माहूर, हदगाव, भोकर, अर्धापूर, मुदखेड, या तालुक्यांत पुरस्थिती निर्माण झाली आहे.

परभणीत बस गेली वाहून – परभणीत देखील जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. पुराच्या पाण्यात परिवहन महामंडळाची बस वाहून गेल्याची घटना परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील वझुर (बु.) या गावी सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. परभणी जिल्ह्यातील करापरा नदीला पूर आल्याने जिंतूर तालुक्यातील कौडगाव, बोर्डी, बोरी, नागणगाव सह अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे. सोयाबीन कापूस पिकात पाणी साचल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पुराच्या पाण्यामुळे परभणी-जिंतूर महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

COMMENTS