Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी

पहिलाच पाऊस चांगला झाल्याने बळीराजा सुखावला

मुंबई/अहमदनगर ः राज्यात गेल्या वर्षी असलेला दुष्काळ आणि अपुर्‍या पावसामुळे शेतकर्‍यांची मोठे हाल झाले. अजुनही पिण्यासाठी पुरेसे पाणी नसतांना जून

थोरात महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणविषयी कार्यशाळा
अमृतवाहिनी ज्युनिअर कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा l पहा LokNews24

मुंबई/अहमदनगर ः राज्यात गेल्या वर्षी असलेला दुष्काळ आणि अपुर्‍या पावसामुळे शेतकर्‍यांची मोठे हाल झाले. अजुनही पिण्यासाठी पुरेसे पाणी नसतांना जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, मंगळवार आणि बुधवारी सलग दोन दिवस पावसाने महाराष्ट्राला चांगलेच झोडपून काढले आहे. जोरदार पाऊस होत असल्यामुळे बळीराजा देखील सुखावला असून, मान्सूनने महाराष्ट्रातील बहुतांश भाग व्यापला आहे. शेतकर्‍यांच्या पेरणीच्या कामांना देखील वेग आल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे नंदूरबारमध्ये वादळी पावसाने केळीच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत.
राज्यभरात बुधवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. नाशिक, अहमदनगर, पालघर, छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील काही जिल्हे, तसेच खान्देश आणि पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहिलाच पाऊस जोरदार झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.  आतापर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रासह मुंबई, डहाणू, ठाणे, नगर, बीड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. मुंबईत पहिल्याच पावसात रस्ते तुंबले असून गेल्या 24 तासात 78 मिली पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे प्रभादेवी, दादर, कुर्ला, सायन शिवडीसहित अनेक परिसरांमध्ये पाणी तुंबले होते. परिणामी रस्ते, रेल्वे वाहतूक प्रभावित झाली होती.
दरम्यान, मराठवाड्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून पाऊस झाल्याने दुष्काळात होरपळत असलेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला. हा दिलासा मिळत असताना दुसरीकडे याकाळात मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली. जिल्ह्यात गेल्या बारा दिवसात 14 जणांचे मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांत होत असलेल्या पावसामुळे धरण आणि प्रकल्पातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. मराठवड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा 3 दिवसांपूर्वी चार टक्क्यांवर आला होता. आता त्यात दीड ते दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या जायकवाडी धरणात 5.65 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. तर मराठवाड्यातील सर्व मोठ्या धरणातील पाणीसाठ्यात सरासरी एका टक्क्याने वाढ झाली आहे. लहान आणि मध्यम प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे हळूहळू टँकरच्या संख्येतही घट होत असल्याने दिलासा मिळत आहे.

अहमदनगर शहरातही जोरदार पाऊस – संगमनेरमध्ये मंगळवारी जोरदार झालेल्या पावसानंतर बुधवारी अहमदनगर शहरासह विविध तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे पुन्हा एकदा नालेसफाईचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून आले होेते. मात्र पहिलाच पाऊस चांगला झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून, पेरणीच्या कामांना वेग येतांना दिसून येत आहे.

COMMENTS