Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस

कोकण, मुंबईत ऑरेंज, विदर्भात यलो अलर्ट जारी

पुणे ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तर काही ठिकाणी पाऊस सक्रिय झाला आहे. मात्र हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार

राज्यात अतिवृष्टीचा इशारा
राज्यात पावसाची दमदार हजेरी
डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

पुणे ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तर काही ठिकाणी पाऊस सक्रिय झाला आहे. मात्र हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यात मात्र मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र त्याव्यतिरिक्त कोकण, मुंबई आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 5 दिवस किनारपट्टी आणि पश्‍चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस होईल. तर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.  मराठवाड्यात 10 जुलैपर्यंत जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत मध्यम तर छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता आहे. तर पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत तसेच नाशिक जिल्ह्यात शुक्रवारपासून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच हवामान खात्याने सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात दमदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भिवंडीला मुसळधार पावसाचा तडाखा – राज्यातील भिवंडीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. परिसरातील नाले तुंबल्याने रस्ते जलमय झाले आहेत. सखोल भागांत गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची दाट शक्यता आहे. भिवंडी शहरातील तीन बत्ती भाजी मार्केट, बाजारपेठ, कल्याण नाका, पटेल नगर, कमला हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तीन बत्ती भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. घरी पोहोचण्यासाठी नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

COMMENTS