Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईसह ठाण्यात पावसाचा धुमाकूळ

बदलापुरातील 200 कुटुंबांना हलवले सुरक्षित स्थळी

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात बुधवारपासून पावसाचा जोर चांगलाचा वाढला असून, कोकणामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जनजीवन विस्

मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ
राज्यात उद्यापासून जोरदार पाऊस

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात बुधवारपासून पावसाचा जोर चांगलाचा वाढला असून, कोकणामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणात रायगड, रत्नागिरीसह मुंबई शहर आणि परिसरात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
कोकण विभागातील ठाणे, पालघर व रायगड जिल्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी, सुर्या, वैतरणा पिजाळ, काळू तसेच रत्नगिरी जिल्हयातील जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी, बावनदी या नद्या इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत. या नद्यांच्या किनार्‍या जवळ राहणार्‍या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यात सर्वदूर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. हवामान विभागाकडून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे रखडलेली खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. तसेच पावसाने ओढ दिलेल्या भागातील पिकांना जीवदान मिळणार आहे.

अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर येथे सोनिवली व हेंद्रेपाडा येथील सुमारे 200 कुटुंबांना बदलापूर येथील बीएसयूपी इमारतीमध्ये हलविण्यात आले आहे. सोनिवली येथील यादव नगर भागातील लोकांना म्हाडा कॉलनी सोनिवली या ठिकाणी शिफ्ट करण्यात येत असून शिफ्टिंगचे काम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यात देखील मोरया नगर, कांबा येथील तब्बल 60 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अंबरनाथ आणि बदलापूरच्या दरम्यान मोरोवली गाव परिसरातील नाल्याचे पाणी रेल्वे रुळावर आल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली होती. तसेच पावसाच्या पार्श्‍वभूमिवर अंबरनाथ येथील सहवास वृद्धाश्रम मधील नागरिकांना देखील स्थलांतरित करण्यात आले आहे. अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्राचीन शिवमंदिराच्या गाभार्‍यात पाणी शिरले. त्यामुळे प्राचीन शिवमंदिरातील शिवलिंग पाण्यात बुडाले. अंबरनाथमध्ये तब्बल 962 वर्ष जुने प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराला लागूनच वालधुनी नदी वाहते. प्राचीन शिवमंदिरातून पिंडीवरील पाणी बाहेर जाण्यासाठी एक आऊटलेट थेट वालधुनी नदीत सोडण्यात आले आहे.

मुंबईतील रेल्वे सेवा झाली ठप्प- राज्यातील अनेक नद्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. पावसामुळे रेल्वे सेवेवर प्रचंड मोठा परिणाम पडला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर जाणारे प्रवाशी परत रेल्वे स्थानकातून बाहेर परततांना दिसत आहेत. महाराष्ट्रात जिकडेतिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती बघायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग, कोल्हापूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस सुरु आहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे कर्जत, अंबरनाथ, बदलापूर येथून मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान लोकल ट्रेनच्या लांबच्या लांब रांगा उभ्या आहेत, त्यामुळे मुंबईला जाणारी वाहतूक अनिश्‍चित काळासाठी बंद झाली आहे, रेल्वे सेवा पूर्ववत होण्यासाठी विलंब लागण्याची शक्यता आहे.

चार महिन्याचे बाळ गेले नाल्यात वाहून- अंबरनाथ लोकल ट्रेन ही ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान सुमारे 2 तास उभी होती. त्यामुळे काही प्रवाशी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते. त्यातच एक 4 महिन्यांचे बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई देखील ट्रेनच्या बाजूने चालत होते. पण अचानक त्या काकाच्या हातातून चार महिन्याचे बाळ निसटले आणि थेट त्या वाहत्या पाण्यात पडले. ज्यानंतर बाळाच्या आईने एकच टाहो फोडला.

COMMENTS