Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदोली परिसरात मुसळधार पाऊस; 110 मिलिमीटर पावसाची नोंद

शिराळा / प्रतिनिधी : चांदोली धरण परिसरात रविवारी सकाळी 7 वाजले पासून दुपारी 4 पर्यंत 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाथरपुंज येथे 119 मिलि

सातारा जिल्हा प्रशासनातर्फे महाबळेश्‍वर येथे राज्यपालांचे स्वागत
विश्‍वास साखर कारखान्याकडून प्रतिटन तीन हजार रुपये वर्ग
जावळी तालुक्यात चोरट्यांकडून 21 बंद घरे लक्ष्य : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिराळा / प्रतिनिधी : चांदोली धरण परिसरात रविवारी सकाळी 7 वाजले पासून दुपारी 4 पर्यंत 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाथरपुंज येथे 119 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 9 तासात दीड टीएमसीने धरणातील पाणीसाठा वाढला आहे. परिसरात अतिवृष्टी होत असल्याने पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्‍चिम विभागातील चांदोली धरण परिसर पावसाचे आगर समजले जाते. येथे वार्षिक चार ते पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. गतवर्षी पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे चेरापुंजीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. चांदोली धरणात पाथरपुंज पासूनच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक होत असते. पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस पडत आहे. पाणलोट क्षेत्रातून सध्या 7 हजार 157 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. 675 क्युसेक विसर्ग वारणा नदीत पात्रता सुरू आहे. ओढ्या-नाल्यांचे पाणी व धरणातील पाणी यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. चांदोली धरणाच्या पाण्याची पातळी 609.10 मीटर झाली आहे. तसेच पाणीसाठा 19.7 टीएमसी असून त्याची टक्केवारी 55.44 झाली आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा 12.19 टीएमसी आहे. गेल्या रविवारी दुपारी 4 वाजे पर्यंत 110 मिलिमीटर पावसासह एकूण 1159 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. असाच पावसाचा जोर वाढत राहिल्यास धरणातील पाणीसाठा वेगाने वाढणार आहे.

COMMENTS