Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाळवणी परिसरात जोरदार पाऊस

भाळवणी ः पारनेर तालुक्यातील भाळवणी व परिसरातील अनेक गावात बुधवारी दुपारच्या दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच वातावरणात मोठ्या प्रमा

मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस
राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे
राज्यात पावसाची दमदार हजेरी

भाळवणी ः पारनेर तालुक्यातील भाळवणी व परिसरातील अनेक गावात बुधवारी दुपारच्या दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत होता. उन्हाच्या काहिलीने लोक त्रस्त झाले होते. दुपारच्या सुमारास  जामगाव, वडगाव आमली, दैठणे गुंजाळ, भांडगाव सह अनेक गावात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. या पावसामुळे भाळवणीच्या आठवडे बाजारात व्यापारी व बाजारकरू यांची मात्र मोठी तारांबळ उडाली. 

COMMENTS