Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोकण गोव्यात पावसाचा जोर कायम

पुणे : सध्या राज्यावर हवामानाची कुठलीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने कोकण आणि गोवा व्यतिरिक्त राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस प

सुकन्या योजना राबविण्यात अमरावती राज्यात प्रथम
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणारा जेरबंद
कर्जत तालुक्यातील खेड गावामधील गरीब कुटुंबातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना गावगुंडाकडून मज्जाव.

पुणे : सध्या राज्यावर हवामानाची कुठलीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने कोकण आणि गोवा व्यतिरिक्त राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि कोकणात पुढील दोन दिवस काही ठिकाणी मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर विदर्भात काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडणार आहे. बहुतांश ठिकाणी वातावरण ढगाळ राहणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
राज्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. यानंतर पावसाने विश्रांती घेतली. राज्यात अनेक भागात ढगाळ हवामान आहे. तर काही ठिकाणी ऊन वाढले आहे. ही स्थिती पुढील आणखी काही दिवस असण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील कोकण भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईत देखील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हवामन विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात सरासरी पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे. त्यानुसार या महिन्याच्या सुरवातीपासून पावसाचा जोर हा कमी झाला आहे. दरम्यान, कोकणासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकणात रत्नागिरी व रायगड तर विदर्भात अकोला, बुलढाणा, अमरावती व नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. पुण्यातील घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

COMMENTS