Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग

मुंबई ः मुंबईसह ठाणे आणि कोकणात रविवारी सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे पश्‍चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रभ

कोकणात 15 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
हैदराबादमध्ये पावसाचा धुमाकूळ
भाळवणी परिसरात जोरदार पाऊस

मुंबई ः मुंबईसह ठाणे आणि कोकणात रविवारी सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे पश्‍चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रभादेवी आणि दादर दरम्यान झाड पडल्याने काही काळ ही वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र आता हे झाड़ बाजूला करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबईत रविवारी देखील पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 48 तास मुंबईत चांगला पाऊस अपेक्षित आहे. तर कोकणात काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. तर ठाणे, पालघरमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार वगळून सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील 4 दिवस राज्यात पावसाची अशीच परिस्थिती राहणार, असंही सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS