नवी दिल्ली ः महाराष्ट्रासह काही राज्यात मान्सून दाखल झाला असून, पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी, उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम असल्याच

नवी दिल्ली ः महाराष्ट्रासह काही राज्यात मान्सून दाखल झाला असून, पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी, उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम असल्याचे दिसून येत आहे. उत्तर भारतात मध्य प्रदेश-उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, गुजरात, बिहार ही राज्ये उष्णतेच्या लाटेशी झुंजत आहेत. प्रयागराज 45.9 अंश तापमाना नोंदवण्यात आले आहे. त्याच वेळी, टिकमगड, गया आणि रोहतकमध्ये पारा 44 अंशांवर नोंदवला गेला. 13 जूनपर्यंत जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, पश्चिम राजस्थान आणि मध्य प्रदेशातही उष्णतेची लाट कायम राहू शकते.
COMMENTS