Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘व्हॅलेंटाईन डे’ पासून होणार सत्ता संघर्षावर सुनावणी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राज्यात सत्तांतर होऊन तब्बल 6 महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी, सत्तासंघर्षावर फैसला अजूनही झालेला नाही. राज्यात आलेले सर

शिराळा शहरालगत चार महाकाय गव्यांचे दर्शन
साकरवाडीमध्ये मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन
डोंबिवलीत तीन मजली इमारती कोसळली

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राज्यात सत्तांतर होऊन तब्बल 6 महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी, सत्तासंघर्षावर फैसला अजूनही झालेला नाही. राज्यात आलेले सरकार वैध की, अवैध ? शिवसेना नेमकी कुणाची ? 16 आमदार पात्र की अपात्र ? असे अनेक प्रश्‍न गेल्या 6 महिन्यापासून प्रलंबित असून, या प्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. त्यामुळे सर्वांनाच आता नियमित सुनावणी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील पुढील सुनावणी व्हलेंटाईन डे अर्थात 14 फेबु्रवारी रोजी ठेवली आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेपासून याप्रकरणावर नियमित सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीश वाय. एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. सात सदस्यांच्या घटनापीठाकडे देण्याची मागणी सिब्बल यांनी केली. युक्तीवादादरम्यान सिब्बल यांनी गेल्या सुनावणीवेळी आम्ही नबाम राबिया खटल्याचा दाखला दिला होता. तसेच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर न्यावे, अशी विनंती केल्याची आठवणही सिब्बल यांनी करुन दिली. त्यानंतर न्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल आणि शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचे मत घेऊन ही सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्या, अशी मागणी केली आहे. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे, पीठासीन अधिकार्‍यांविरोधात अविश्‍वास प्रस्ताव प्रलंबित असेल तर त्यांना कारवाईचा अधिकार आहे की, नाही हा या सगळ्या प्रकरणातला कळीचा मुद्दा आहे. अरुणाचल प्रदेशातील 2016 च्या नबाम रेबिया केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तीच्या पीठाने महत्वाचा निकाल दिला आहे. अविश्‍वास प्रस्ताव प्रलंबित असताना पीठासीन अध्यक्षांना कारवाईचा अधिकार नाही, असे या निकाल नमूद करण्यात आले होते. शिंदे गट याच निकालाचा आधार घेत, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना अपात्रतेबाबत कारवाईचा अधिकार नाही, असे म्हणतोय. पण अरुणाचल आणि महाराष्ट्राच्या केसमधले संदर्भ, परिमाणे ही वेगळी आहेत त्यामुळे या निकालाचा सरधोपट अर्थ न काढता अधिक विश्‍लेषण करुन निकाला द्यावा अशी ठाकरे गटाची मागणी आहे.

सगळे प्रेमाने होईल ः संजय राऊत
राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून, 14 फेबु्रवारी अर्थात व्हॅलेंटाईन डेपासून नियमित सुनावणी होणार आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की,14 तारखेला व्हेंलटाईन डे आला आहे. समजून जा, त्या दिवशी सगळे प्रेमाने होईल. नेमके प्रेमाने काय होईल ? शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येतील का ? की न्यायालयात याचा फैसला होईल, असे अनेक प्रश्‍न राऊत यांच्या वक्तव्याने निर्माण झाले आहे.

एवढया विलंबाने तारखा द्यायला नको ः अ‍ॅड. असीम सरोदे
सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाची सुनावणी 14 फेबु्रवारी रोजी ठेवल्यानंतर अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेली तारीख ही दुःखद घटना वाटते. एवढ्या विलंबाने तारखा द्यायला नकोत. जर कुणी बेकायदेशीरपणे सत्ता काबीज केली असेल किंवा घटनाबाह्य पद्धतीने राज्य सरकार अस्तित्त्वात असल्याच्या शंका असतील तर घटनाबाह्य काम करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय नकळत परवानगी देत आहे का? असा प्रश्‍न यामुळे निर्माण होतो. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण हे मोठ्या खंडपीठाकडे जावे, अशी मतदारांतर्फे आमची मागणी असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

COMMENTS