Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जरे हत्याकांड प्रकरण वर्ग करण्यावर 16 डिसेंबरला सुनावणी

आरोप निश्‍चितीसाठी नगरला 15 रोजी होणार सुनावणी

अहमदनगर प्रतिनिधी - यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांचा खून खटला नगरच्या न्यायालयात न चालवता तो नाशिक वा ठाणे न्यायालयात चालवण्याची

लस न घेतलेल्यांना पेट्रोल व रेशन नाही : पालक मंत्री मुश्रीफ
मोदींना हवेत चारशे पार ! शिर्डीत मात्र दिसते हार !!
देवठाण येथील शिबिरातून 46 बॅगचे रक्तसंकलन

अहमदनगर प्रतिनिधी – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांचा खून खटला नगरच्या न्यायालयात न चालवता तो नाशिक वा ठाणे न्यायालयात चालवण्याची मागणी या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिकेद्वारे केली असून, त्यावर येत्या 16 डिसेंबरला दोन्ही बाजूंचे युक्तिवाद होणार आहेत. दरम्यान, या खून खटल्यातील सर्व आरोपींविरुद्धची आरोप निश्‍चितीची प्रक्रिया प्रलंबित असून, त्यासाठी येत्या 15 डिसेंबरला जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे, अशी माहिती रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांच्यावतीने काम पाहणारे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी दिली.


दोन वर्षांपूर्वी म्हणजे 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची निर्घृण हत्या झाली आहे. या प्रकरणी रेखा जरे यांच्या आई सिंधूबाई वायकर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ज्ञानेश्‍वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) या 5 आरोपींना अटक केली व त्यानंतर या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार दैनिक सकाळचा तत्कालीन निवासी संपादक व पत्रकार बाळ ज. बोठे याला सुमारे साडेतीन महिन्यांनी हैदराबादला पकडले.


त्यावेळी बोठेला फरार होण्यास मदत करणारे अ‍ॅड. जनार्दन अकुला चंद्राप्पा, राजशेखर अजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ यांना अटक करण्यात आली. तसेच पी. अनंतलक्ष्मीव्यंकटम सुब्बाचारी या महिलेचाही त्यामध्ये समावेश होता. पण ती अजूनपर्यंत सापडू शकलेली नाही. याच वेळी नगरमधून महेश तनपुरे यालाही बोठेला मदत केल्याबद्दल पकडण्यात आले होते. या सहाजणांविरुद्ध बोठेला मदत केल्याप्रकरणी कारवाई केली गेली आहे. या सर्व 12 आरोपींविरुद्धचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाले असले तरी आरोप निश्‍चितीची प्रक्रिया बाकी आहे. ती येत्या 15 रोजी होणार्‍या सुनावणीच्या दिवशी होणे अपेक्षित आहे. दरम्यान, नगरच्या न्यायालयात सुरू असलेला जरे हत्याकांड खटला नाशिक वा ठाणे न्यायालयात वर्ग करण्याची मागणी आरोपी बोठे याने खंडपीठात याचिकेद्वारे केली आहे. त्यावर मागील 5 डिसेंबरला प्राथमिक सुनावणी झाली आहे. सरकार पक्षातर्फे म्हणणे मांडण्याची मुदत घेण्यात आली होती व त्यानुसार लेखी म्हणणे मांडले गेले आहे. आता येत्या 16 डिसेंबरला दोन्ही बाजूंचे युक्तिवाद खंडपीठासमोर होणार आहेत.

COMMENTS