Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉक्टर्स डे निमित्ताने सावळेश्वर येथे आरोग्य शिबीराचे आयोजन

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील सावळेश्वर येथे डॉक्टर्स डे निमित्ताने सर्व रोग निदान व मोफत औषधोपचार शिबीराचे मातोश्री क्लिनीक सावळेश्वर व अंबाजो

जिल्हाधिकाऱ्यांचे धडक कारवाईमुळे पाथर्डीतील सहा दुकानाला लागले सील
मेंदूचे पुनर्भरण व्हावे !
पुण्यात सराफावर कोयत्याने वार

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील सावळेश्वर येथे डॉक्टर्स डे निमित्ताने सर्व रोग निदान व मोफत औषधोपचार शिबीराचे मातोश्री क्लिनीक सावळेश्वर व अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिसनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले.सावळेश्वर येथे डॉक्टर्स डे निमित्त अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिसनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डे निमित्त मोफत सर्व रोग निदानमोफतऔषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला डॉक्टर राहुल धाकडे,डॉक्टर विवेक मुळे,डॉक्टर ऋषिकेश खुले,डॉक्टर महेंद्र कुमार जाधव,डॉक्टर संदीप मोरे,डॉक्टर विठ्ठल केंद्रे व मातोश्री क्लिनिकचे डॉक्टर शिवाजी मस्के यांनी सर्व रुग्णांची तपासणी केली या शिबिरात महिलांची मोठ्या प्रमाणात तपासणी झाली तसेच लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींचींही मोठ्या प्रमाणात तपासणी झाली यात विविध आजाराची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गावातील उपसरपंच अंकुश करपे तसेच सरपंच मारुती कांबळे व गावातील मान्यवर उपस्थित होते या सर्व रोग निदान शिबिरात सर्व रुग्णांना उपलब्ध औषध ही मोफत देण्यात आली.या शिबिरात दंत तपासणी ,शुगर,बीपी छातीचे विकार,मधुमेह, मूळव्याध,बालकांचे विविध आजार यांचीही मोठ्या प्रमाणात तपासणी झाली ,तसेच कृषीदिना निमीत्त शेतकरी वर्गाचा सत्कार करण्यात आला. या वेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी मधुकर कदम,तानाजी करपे,गणेश मस्के,संपत मस्के,अविनाश बोराडे यांनी सहकार्य केले.

COMMENTS