Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख रामेश्‍वर नाईक

मुंबई :मुख्यमंत्री सहायता निधी विभागाच्या प्रमुखपदावरून मंगेश चिवटे यांना हटवण्यात आले. तसेच त्यांच्या जागी रामेश्‍वर नाईक यांची नेमणूक करण्यात आ

प्रेग्नेंट असून दीपिकाने केला डान्स
राज ठाकरेंची त्यासाठी लायकी नाही : इम्तियाज जलील
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांमुळे सातारा शहरातील टँकरवाल्यांची दिवाळी सुरु

मुंबई :मुख्यमंत्री सहायता निधी विभागाच्या प्रमुखपदावरून मंगेश चिवटे यांना हटवण्यात आले. तसेच त्यांच्या जागी रामेश्‍वर नाईक यांची नेमणूक करण्यात आली आहे. हा एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का असल्याचे मानला जात आहे. कारण एकनाथ शिंदे यांचे विश्‍वासू म्हणून मंगेश चिवटे यांची ओळख होती. तसेच वैद्यकीय सहायता निधी अनेकांना मिळवून देण्यात त्यांचा सर्वात मोठा वाटा होता, मात्र शिंदे यांच्या विश्‍वासू शिलेदाराची जबाबदारी काढून रामेश्‍वर नाईक यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. रामेश्‍वर नाईक यांच्याकडे यापूर्वी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी होती. धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यात रामेश्‍वर नाईक यांचे मोठे योगदान आहे.
मंगेश चिवटे हे पूर्वाश्रमीचे पत्रकार आहेत. त्यांनी मुंबईत अनेक वृत्तवाहिन्यांसाठी वार्ताहार म्हणून काम केले आहे. तसेच काही काळ चिवटे यांनी दिल्लीतही पत्रकारिता केली आहे. पत्रकार म्हणून काम करत असतानाच मंगेश चिवटे यांनी गोरगरीब रुग्णांसाठी काम करण्यास सुरुवात केली होती. या कामाला शासकीय यंत्रणेची ताकद मिळावी, या हेतूने चिवटे यांनी 2015 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची संकल्पना मांडली. मंगेश चिवटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे काही महिन्यांनंतर ही संकल्पना पूर्णत्वास आली आणि या कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील लाखो गरीब आणि अडल्या-नडलेल्या रुग्णांना आर्थिक मदत मिळू लागली.

COMMENTS