… ते आपल्या कर्माने मरणार : मुख्यमंत्री ठाकरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

… ते आपल्या कर्माने मरणार : मुख्यमंत्री ठाकरे

राज ठाकरेंच्या सभानंतर राज्यात उद्धव ठाकरेंच्या सभा

मुंबई/प्रतिनिधी ः भोग्यांवर सर्व प्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठवला होता. हिंदुत्वावर बोलण्यार विरोधकांची लायकी नाही, देशाचे शत्रू

‘आरटीई’ची सोमवारी निवड व प्रतीक्षा यादी
आंबेजोगाई जिल्हा निर्मितीसाठी वकील संघाची भव्य रॅली
नायब तहसीलदारांचे काम बंद आंदोलन; राजपत्रित वर्ग-2 संवर्गाच्या ’ग्रेड पे’च्या वाढीची मागणी

मुंबई/प्रतिनिधी ः भोग्यांवर सर्व प्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठवला होता. हिंदुत्वावर बोलण्यार विरोधकांची लायकी नाही, देशाचे शत्रू संपवण्यापेक्षा पक्षाचे शत्रू संपवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. आम्ही बनावट आणि नकली हिंदुत्ववाद्यांना पोसले, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. इतकेच काय तर हे आपल्या कर्माने मरणार आहेत, अशा शब्दात ठाकरेंनी टीका केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शनिवारी शिवसंपर्क अभियानाच्या दुसर्‍या टप्यासाठी शिवसेना पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाच्या भाषणा दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सध्याच्या राजकीय स्थितीवर तसेच इतर अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. तसेच, विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राज्यभरात सभा घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याची सुरुवात मराठवाडा व मुंबईपासून होणार आहे. 14 मे रोजी मुंबईत बीकेसी येथे तर 8 जून रोजी मराठवाड्यात सभा घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री सभा घेणार आहेत. शिवसेनेवर विरोधक तुटून पडले आहेत. मात्र, आमच्याकडेही फटाके आहेत. ते कसे फोडायचे हे आता पाहू, असे सुचक वक्तव्य राऊत यांनी केले. तसेच, सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना प्रमुखांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आमच्यावर हल्ला करणार्‍यांवर प्रतिहल्ला करावाच लागेल. त्यांचे ढोगांचे बुरखे फाडावे लागतील. त्यासाठी राज्यात दोन महत्त्वपूर्ण सभा उद्धव ठाकरे घेत आहेत. त्यानंतर राज्यभरात सभा घेतल्या जातील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

दंगली घडवून देशाचे विभाजन करण्याचा डाव ः संजय राऊत
हनुमान चालीसाच्या नावावर या देशात दंगली घडवून विभाजन करण्याचा डाव असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. जशास तसे उत्तर देणे हा शिवसेनेचा धर्म आणि स्वभाव आहे. शिवसेनेच्या बदनामीची, खासकरुन महाराष्ट्राच्या बदनामीचा एक व्यापक कट काही असामाजिक संघटनांनी एकत्र सुरु केला आहे. अनेक माध्यमातून त्यांना महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करायची आहे. शिवसेना कोणत्याही प्रसंगाला सामोरं जायला तयार आहे. मग कुणीही समोर येऊ देत. शिवसेना छातीवर वार झेलणारा आणि समोरुन वार करणारा पक्ष आहे. पाठीमागचे वार आमच्यात चालत नाहीत, असा इशारा राऊतांनी दिला.

COMMENTS