अमरावती प्रतिनिधी :- वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिंगोरी या गावापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्डी या ठिकाण

अमरावती प्रतिनिधी :- वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिंगोरी या गावापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्डी या ठिकाणापासून अप्पर वर्धा धरणाच्या बॅक वॉटर पात्रात जुनी सुरवाडी, भुताबर्डी या ठिकाणी अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आंदोलन काही दिवसांपासून सुरु आहे अशातच शुक्रवारी रात्री उपोषण मंडपात एका उपोषणकर्त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात राहणारे गोपाल दहीवडे असे गळफास घेऊन आत्महत्या करण्याऱ्या आंदोलकांचे नाव आहे. अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आंदोलन सुरु आहे. शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या अप्पर वर्धा धरणग्रस्तांना कायमस्वरूपी व हक्काची जमीन देण्यात यावी, सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक प्रमाणपत्र धारकांना 25 ते 30 लाख रुपये फरकाची राहिलेली रक्कम व्याजासहित देण्यात यावी. ज्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही प्रमाणपत्र मिळाले नाहीत त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे. ज्या शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही अशा संपूर्ण शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावानुसार अनुदान मिळावे या सर्व मागण्याची शासनाकडून पूर्तता ना झाल्यामुळे शासनाच्या व प्रशासनाच्या आडमुठेपणा मुळे २५१ दिवसांपासून सुरू असलेल्या मोर्शी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरूच आहे. त्यांच्या मागण्याची पूर्तता न झाल्यामुळे गोपाल दहीवडे यांनी आत्महत्या केली असून आपल्या आत्महत्येला शासन प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी लिहून ठेवले आहे. सध्या या ठिकाणी तणावाची परिस्थिती असून हा लढा असाच सुरुच ठेवावा असेही गोपाल यांनी लिहून ठेवले आहे. घटनास्थळावर पोलीस पोहचले असून पुढील तपास सुरु केला आहे
COMMENTS