Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हतेडी बु. येथिल अवैध दारूविक्री बंद करा

शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

बुलडाणा प्रतिनीधी - येथून जवळच असलेल्या हतेडी बु. येथे सर्रास दारुविक्री केली जाते. त्यामुळे पुरुष मंडळी व्यसनाधीन झाली आहे. घरातील कर्ता पुरुष द

मनपा जागा बळकावण्यासाठी सार्वजनिक शौचालय जमीनदोस्त
गरज भासल्यास दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करू : राजनाथ सिंह
ऑस्ट्रेलिया-भारत युवा संवादासाठी आमदार तांबेंची निवड

बुलडाणा प्रतिनीधी – येथून जवळच असलेल्या हतेडी बु. येथे सर्रास दारुविक्री केली जाते. त्यामुळे पुरुष मंडळी व्यसनाधीन झाली आहे. घरातील कर्ता पुरुष दारूच्या आहारी गेल्याने कुटुंबाची आबाळ होत आहे. व्यसनापाई त्यांना कुटुंबाची पर्वा राहिलेली नाही. दारुमुळे मुलांचे शिक्षण, पालनपोषण, मुलींचे लग्नकार्य अशा जबाबदाऱ्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे म्हणून आज हतेडी च्या शेकडो महिलांनी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अवैध दारु विक्री करणारे सर्वांनवर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. तसेच आमच्या संसाराची राखरांगोळी होत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे. दारुमुळे कुटुंबात भांडणे, कलह वाढले आहेत. आम्ही महिला अक्षरशः कंटाळलो आहोत.

गावात चार ते पाच ठिकाणी दारु विक्री सुरु आहे. बाहेरुन देशी, विदेशी दारु विकण्यासाठी आणली जाते. पुरुषांप्रमाणाने तरुणपिढी सुद्धा व्यसनाच्या आहारी जात असल्याचे बघायला मिळत आहे. दारूविक्रीचे एक ठिकाण तर शाळेच्या अगदी जवळ आहे. याचा बाल मनावर काय परिणाम होत असेल याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे. दारुबंदीसंदर्भात वेळीच ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. गावात दारु कुठून आणली जाते? दारूविक्रेत्याना कुणाचा पाठिंबा आहे? याचा हि शोध घ्यावा व त्याच्यावर सुध्दा कारवाई करावी, निवेदनावर
संध्या पुंडलिक जाधव, श्रीकांत जाधव, विजय निकाळजे, राहुल ठोंबरे,उमेश ठोंबरे, समिक्षा जाधव यांच्या सह्या आहेत

COMMENTS