Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हसन मुश्रीफांचा पाय खोलात

कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीची छापेमारी

कोल्हापूर/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते हसन मुश्रीफांच्या घरी व कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे छ

पुणे शहरात प्लाझ्माचा तुटवडा निर्माण
Dakhal : पंतप्रधान मोदी आणि अमित शहाने देशाचे वाटोळे केले LokNews24
समाजाला दिशा देण्याचे काम ज्ञानेश्वरराव काळदाते यांनी केले : माजी न्यायमूर्ती बी. एच. मरलापल्ले

कोल्हापूर/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते हसन मुश्रीफांच्या घरी व कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे छापे पडत असल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होत दिसून येत होते. मात्र बुधवारी  मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. बँकेच्या कागलमधील शाखेत ईडीचे काही अधिकारी पोहचले आहेत, यामुळे आता हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बुधवारी सकाळपासून ईडीच्या अधिकार्‍यांकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापशी येथील साखर कारखाना व मुलीच्या घरी ईडीने छापे टाकले होते. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर 11 जानेवारी रोजी ईडीने छापेमार केली होती. त्यानंतर आज कोल्हापूर जिल्हा बॅकेच्या मुख्य शाखेवर सकाळी अकरा वाजता शाहूपुरी येथील मुख्यकार्यालयात ईडीचे पथक पोहचले आहे. याआधी मुश्रीफांचे निकटवर्तीय असलेले माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकरांच्या निवासस्थानासह सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यावर धाड टाकण्यात आली होती. यासोबतच मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासणे मैदान परिसरातील घरावरही यावेळी छापा टाकण्यात आला होता. मागील छापेमारीत काय माहिती मिळाली हे समोर आले नसले तरी ईडीने केलेल्या दुसर्‍या छापेमारीमुळे कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ असल्याने त्यांच्यावर काय कारवाई होणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ईडीचे अधिकारी बँकेत आल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बँकेच्या आवारात जमायला सुरूवात झाल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पहाटे 6 वाजताच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकले. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयासह 100 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्यांनी केला होता. या प्रकरणीच ही छापेमारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS