Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आढळवाडी येथील हरिनाम सप्ताहाची सांगता

 अकोले : तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील आढळवाडी येथे काल्याच्या कीर्तनाने टाळ, मृदुंगाच्या गजरात अन माऊली तुकोबाचा जयघोष करत अखंड हरिनाम सप्त

शेरणखेल येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर
अकोलेतील २१ खडी क्रशर केले सील  
दहावीच्या  निरोप समारंभात कवितांचा बहर

 अकोले : तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील आढळवाडी येथे काल्याच्या कीर्तनाने टाळ, मृदुंगाच्या गजरात अन माऊली तुकोबाचा जयघोष करत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगत करण्यात आली.

 ह.भ.प.अनंत महाराज काळे (संगमनेर) यांच्या कीर्तनाने स्त्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. महाराजांनी आपल्या कीर्तनरुपी सेवेतून भगवान श्रीकृष्ण यांच्या मथुरेतील कारागृहातील जन्म आणि सुटका या प्रसंगाचं केलेलं वर्णन, त्यानंतर भगवान श्रीकृष्ण यांना गोकुळामध्ये आणल्यानंतर गवळणींनी बाल कृष्णाच्या स्वरूपाचं केलेले मोहक वर्णन, तसेच बालकृष्ण आणि बालगोपाळ यांचं एकमेकांवर असणारे प्रेमभाव, त्यांच्यासोबत केलेल्या क्रीडा यांचे केलेलं व मनमोहक वर्णन, गोपीकांबरोबर साधलेला संवाद आणि गोकुळातून प्रस्थान करताना गवळणींना झालेल्या विरहाचे वर्णन महाराजांनी अत्यंत गोड  अमृतमय वाणीने केले.

 या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने ह.भ.प.ऋतुजा बगनर ( पिं.नाकविंदा आढळवाडी), संगीतविशारद ह.भ.प.गोरख  सगभोर(श्रीधाम वृंदावन),ह.भ.प. अमोल  भोत (रूंभोडी), भागवताचार्य ह.भ.प. पूजा कोंडार (मवेशी), ह.भ.प. साधनाताई कोरडे (जुन्नर), ह.भ.प.चैतन्यगिरी (केळी रूम्हणवाडी), गायनाचार्य ह.भ.प.राजेंद्र  सदगीर ( आळंदी) तसेच शेवटी गायनाचार्य ह.भ.प. अनंत  काळे (संगमनेर) आदी  किर्तनकारांचे हरिकीर्तन झाली. प्रत्येक दिवशी काकडा,जागर,हरिपाठ,किर्तन तसेच अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटी महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.या सप्ताह कालखंडात समस्त भजनी मंडळ, तरूण मित्र मंडळ, ग्रामस्थ व महिला भगिनिंनी मोलाचे योगदान दिले.

 

COMMENTS