Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हरीभाऊ बागडेंचा आमदारींचा राजीनामा

राजस्थानचे राज्यपाल म्हणून घेणार सूत्रे हाती

मुंबई ः भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सोमवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. ते छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क
शिव ठाकरे बिग बॉसमधून बाहेर ?
VIRAL VIDEO : मास्क नाकाखाली आल्यामुळे पोलिसांनी भयंकर चोपला | Lok News24

मुंबई ः भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सोमवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. ते छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. ते लवकरच आपल्या नव्या घटनात्मक पदाची जबाबदारी घेतली. यामुळे बागडे यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची औपचारिकता पार पाडली.
हरीभाऊ बागडे यांनी सोमवारी सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे भाजपची सभागृहातील सदस्यसंख्या एका सदस्याने कमी झाली आहे. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी 27 जुलै रोजी हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानुसार ते लवकरच आपल्या पदाची सूत्रे सांभाळतील. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बागडे यांचे अभिनंदन केले. विधिमंडळ सचिवालयाच्या वतीनेही त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी प्रधान सचिव जितेंद्र भोळेही उपस्थित होते. हरिभाऊ बागडे यांच्या यांच्या राजीनाम्यामुळे आता फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सुरू झाली आहे. 

COMMENTS