अश्‍लील मजकुराच्या चिठ्ठ्या घरात टाकून महिलेचा विनयभंग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अश्‍लील मजकुराच्या चिठ्ठ्या घरात टाकून महिलेचा विनयभंग

अहमदनगर/प्रतिनिधी : महिलेच्या घरात लज्जा उत्त्पन्न होईल अशा मजकुराच्या चिठ्ठ्या टाकून विनयभंग केला तसेच महिलेच्या पतीस शिवीगाळ व मारहाण करुन जीवे मार

गोदावरीच्या दूध उत्पादकांना मिळणार दहा लाखाचे विमा कवच
संजय आनंदकर अ‍ॅकडमीच्या 12 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू ; अत्याचारानंतर खून केल्याचा संशय

अहमदनगर/प्रतिनिधी : महिलेच्या घरात लज्जा उत्त्पन्न होईल अशा मजकुराच्या चिठ्ठ्या टाकून विनयभंग केला तसेच महिलेच्या पतीस शिवीगाळ व मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नेवासे तालुक्यातील मडकी येथे घडली असून याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मडकी येथील निवृत्ती भानुदास वरकड याने मागील पाच ते सहा महिन्यांपासून एका विवाहीत महिलेकडे वेळोवेळी वाईट वासनेने पाहून तिच्या घरात तिच्या नावाने चिठ्ठ्या टाकल्या. त्याला खिडकीतून चिठ्ठी टाकताना त्या महिलेने पाहिले. चिठ्ठीतील मजकूर वाचून तिला लज्जा उत्त्पन्न झाली. त्यानंतर तिने हा प्रकार तिच्या पतीस सांगितला. त्यांनी वरकड याच्या घरी जाऊन या प्रकाराबाबत विचारणा केली असता त्याने हातात खोरे घेऊन तर भारत वरकड याने हातात काठी घेऊन तसेच विमल निवृत्ती वरकड यांनी या दाम्पत्यास शिवीगाळ करुन मारहाण करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेले व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस नाईक एन. एम.भताणे करीत आहेत.

COMMENTS