Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हर घर तिरंगा भारताच्या एकजुटीचे प्रतीक ः मंत्री विखे पाटील

अहमदनगर ः भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमिताने आयोजित केलेले  हर घर तिरंगा अभियान अखंड आणि बलशाली भारताच्या एकजुटीचे  प्रतिक  ठरणार असल्याने या अ

देवळाली प्रवरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा
तक्रार निवारण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू करावा
मनोज अंबिलवादे यांची निवड

अहमदनगर ः भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमिताने आयोजित केलेले  हर घर तिरंगा अभियान अखंड आणि बलशाली भारताच्या एकजुटीचे  प्रतिक  ठरणार असल्याने या अभियानात प्रत्येक नागरीकांने सहभाग घेवून स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आवाहन महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष उत्साही वातावरणात संपन्न झाले. देशाला  बलशाली  बनविण्यासाठी देशभर यानिमिताने हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले.तोच उत्साह देशातील नागरीकांमध्ये कायम राहावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी सुध्दा हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्या मध्येही  घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून याचा शुभारंभ आश्‍वी येथील महाविद्यालयातून पालकमंत्र्याच्या उपस्थितीत करण्यात आला. हर घर तिरंगा अभियान संपूर्ण  जिल्ह्यात लोकसहभागातून यशस्वी व्हावे असे सुचित करून प्रशासनाने सर्व शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था व्यापारी प्रतिष्ठान विविध संघटनाच्या प्रतिनिधीशी समन्वय साधून स्वातंत्र्य दिन हर घर तिरंगा अभियानाने साजरा करण्याचे  आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. मंत्री विखे पाटील म्हणाले की, स्वातंत्र दिनाच्या निमिताने हर घर तिरंगा अभियान राबविण्याची संकल्पना अखंड भारताच्या एकजुटीचे प्रतिक ठरणार असल्याने  यामध्ये गावपातळीवर सर्वच राजकीय पक्ष  संघटनांचा   सहभाग असावा असा प्रयत्न पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करावा.हर घर तिरंगा अभियान अराजकीय असून  सर्व शासकीय अधिकार्‍यांनी स्थानिक पातळीवर सर्व राजकीय पक्षांचा या उपक्रमात सहभाग होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे मंत्री विखे पाटील यांनी सूचित केले.

COMMENTS