Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांची दिवाळी गोड ! पगारात झाली इतकी वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिवाळीआधीच आपल्या कर्मचार्‍यांना दिवाळी भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात अर्थात डीएमध्

आमदार दळवी यांच्या गाडीचा अपघात
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरण सुरू
जळगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिवाळीआधीच आपल्या कर्मचार्‍यांना दिवाळी भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात अर्थात डीएमध्ये तब्बल 3 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे कर्मचार्‍यांना मिळणारा डीए आता 53 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. महागाई भत्त्याची वाढ 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचा डीए त्यांच्या मूळ वेतनाच्या आधारे ठरवला जातो. जर एखाद्या कर्मचार्‍याचा मूळ पगार 25 हजार रुपये असेल तर या वाढीनंतर त्याचा डीए 53 टक्के झाला आहे. अशावेळी डीए 12500 रुपयांवरून 13250 रुपयांपर्यंत वाढतो. त्यामुळे महागाई भत्त्यात दरमहा 750 रुपयांची वाढ झाली आहे. तर जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांची डीएची थकबाकी (750+750+750) 2250 रुपये होते. या सर्वांची भर ऑक्टोबरच्या पगारात पडणार आहे. म्हणजेच बेसिक सॅलरी, डीए आणि हाऊसिंग अलाऊंस म्हणजेच एचआरए जोडून कर्मचार्‍याचा पगार 50000 हजार रुपये येत असे, तर आता या महिन्यापासून 50750 रुपये येतील. तर, तीन महिन्यांची थकबाकी 2250 रुपये असेल. केंद्र सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांना डीए देते, तर पेन्शनधारकांना डीआर दिले जाते. सर्वसाधारणपणे डीए आणि डीआरमध्ये वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये वाढ केली जाते. याआधी मार्चमहिन्यात सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. 2006 मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए आणि डीआर मोजण्याच्या फॉर्म्युल्यात बदल केला.

COMMENTS