Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हांडे फाउंडेशनने केला गुणवंताचा सन्मान

अकोले ः शिवाजीनगर अकोले येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संभाजी ब्रिगेड प्रदेश सचिव डॉक्टर संदीप कडलग यांच्या हस्ते झेंडावंदन करण

प्रत्येकाची दिवाळी मंगलमय व गोड व्हावी यासाठी सामाजिक उपक्रमाची गरज – भूपेंद्र रासणे
एस टी कामगारांच्या मागण्यांवर लवकरच तोडगा निघेल- नामदार शंकरराव गडाख
अमृतवाहिनीच्या डॉ लोंढे ,डॉ. चव्हाण व डॉ. गुरव यांची पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड

अकोले ः शिवाजीनगर अकोले येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संभाजी ब्रिगेड प्रदेश सचिव डॉक्टर संदीप कडलग यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. प्रास्ताविकात जादूगार पी.बी हांडे यांनी संस्थेचे कार्य, नागरिक म्हणून आपले कर्तव्य, अनिष्ट  रुढी व स्वच्छतेचे महत्व याविषयी नमुद केले. जादूगार  हांडे फाउंडेशन विद्यार्थी प्रोत्साहनपर कार्य करत असते. एस.एस.सी मार्च 2024 परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी पुर्वा  धनंजय जाजू, आदित्य रविंद्र कोंडार, सानिका मच्छिंद्र देशमुख तसेच विविध पदावर  नियुक्ती झालेले योगिता भिमा घिगे, त्रुप्ती हिरामन  गोडे ,प्रियांका अशोक साबळे, संध्या राहूल शेंगाळ, योगेश पांडुरंग थोरात, प्रफुल्ल बारकु बांडे यांचा सन्मान चिन्ह सन्मान पत्र, पुष्प गुच्छ देंऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सोहळ्यात  डॉक्टर  संदीप कडलग,प्रमोद  मंडलीक. ठकसेन फापाळे प्रा एन.व्ही. साळवे यांनी. मार्गदर्शन केले. या प्रसंगी झालेल्या कवी संमेलनात अर्चना राहूरकर, मंदाकिनी हांडे, ए. बी देशमुख, पुष्पा नांईकवाडी इ. मान्यवर कवींनी सहभाग नोंदवला. या सोहळ्यात माजी नगरसेवक प्रमोद मंडलीक, वकील ठकसेन फापाळे, ज्येेष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलीक, प्रा.एन.व्ही साळवे. डॉ. विठ्ठल भांगरे, किसन मंडलीक नरेंद्र देशमुख, बी.टी जोरवर, दिलीप डोखे, सुरेखा ढगे, शेंगाळ व, मेजर भास्कर तळेकर, मेजर संतू भोर,गोदके  इ. मान्यवर सोबत पालक व नागरिक   मोठ्या संख्येत  ऊपस्थित होते.या शानदार सोहळ्याचे प्रभावी सूत्रसंचालन  पुष्पा  नाईकवाडी यांनी केले. संस्था सचिव मंदाकिनी हांडे यांनी  आभार प्रदर्शन केले

COMMENTS