Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हाफीज ए कुरआन कडून मुक्तपत्रकार एस.एम. युसूफ यांचा सत्कार

समाजातील प्रत्येक प्रश्नावर परखड लिखाण सुरू ठेवा-हाफीज मन्सूरबीड । प्रतिनिधीशहरातील मुक्तपत्रकार एस.एम. युसूफ़ यांनी पत्रकारिता क्षेत्रात बारा वर्ष

तहसिलदार गायकवाड यांना वृक्षरोप देऊन पत्रकारांनी वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा…!
समृद्धी महामार्ग तब्बल ५ दिवस राहणार बंद
लोणंदच्या कु. पायल जाधव हिला कराड येथे तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

समाजातील प्रत्येक प्रश्नावर परखड लिखाण सुरू ठेवा-हाफीज मन्सूर
बीड । प्रतिनिधी
शहरातील मुक्तपत्रकार एस.एम. युसूफ़ यांनी पत्रकारिता क्षेत्रात बारा वर्षे (एक तप) पूर्ण केल्याबद्दल त्यांचा हाफ़ीज़ ए कुरआन मन्सूर साहब यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी फॅन्सी कलेक्शनचे संचालक शेख फ़ानूस, बाबुभाई तसेच आऊटफिट टेलरिंग शॉपचे संचालक सय्यद जुबेर यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्कारप्रसंगी बोलताना हाफ़ीज़ मन्सूर म्हणाले की, गेल्या 12 वर्षांपासून आपण करत असलेली निष्पक्ष, निर्भीड व परखड पत्रकारिता यापुढेही समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रश्नांसाठी अशीच सुरू राहावी. अल्लाह आपल्याला सदैव निरोगी व तंदुरुस्त ठेवो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी एस.एम. युसूफ़ म्हणाले, पत्रकारिता क्षेत्रात एक तप पूर्ण केल्यानंतर पहिलाच सत्कार हा एका हाफ़ीज़ ए कुरआन यांच्या हस्ते होत आहे, हा माझ्यासाठी अत्यंत भाग्याचा आणि प्रेरणादायी क्षण आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS