Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीतल्या जिम मालकाची गोळ्या झाडून हत्या

दिल्ली / प्रतिनिधी : राजधानी दिल्लीतल्या ग्रेटर कैलाश या विभागात असलेल्या जिम मालकाची लॉरेन्स बिश्‍नोई गँगने हत्या केल्याचा संशय आहे. ग्रेटर कैला

प्राचार्य,उपप्राचार्य, प्राध्यापक,पत्रकार अशा बारा जोड्यांची नैनीतालची दुरची  टुर
सलमानच्या घरावर गोळीबार करणार्‍या आरोपीची आत्महत्या
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट

दिल्ली / प्रतिनिधी : राजधानी दिल्लीतल्या ग्रेटर कैलाश या विभागात असलेल्या जिम मालकाची लॉरेन्स बिश्‍नोई गँगने हत्या केल्याचा संशय आहे. ग्रेटर कैलाशमध्ये असलेल्या जिमचा मालक नादिर शाह याची दोन अज्ञातांनी गुरुवारी रात्री हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी निलेश तिवारी, विशाल वर्मा, आकाश यादव आणि नवीन बालियान या चौघांना अटक केली आहे. जिम मालकाच्या हत्येने दिल्ली शहर पुन्हा एकदा हादरले आहे.

जिम मालक नादिर शाह आणि कुणाल छाबडा हे दोघंही व्यावसायिक भागीदार होते. कुणाल छाबडा दुबईत राहत असून त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाले आहे. कुणाल छाबडाकडे लॉरेन्स गँगने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, नादिर शाह याने कुणालला हे पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर नादिर शाह हा लॉरेन्स गँगच्या रडारवर आला. त्यातूनच त्याची हत्या केली गेली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

नादिर शाह याच्या हत्येचा दुसरा पैलूही पोलीस तपासत आहेत. नादिर शाह आणि दक्षिण दिल्लीतले गँगस्टर रवि गंगवाल आणि रोहित चौधरी यांची चांगली मैत्री होती. या दोघांची आणि दिल्लीतल्या उत्तर भागातील गँगस्टर हाशिम बाबा यांच्यात हाडवैर होते. बिश्‍नोई गँगने हाशिम बाबाशी संपर्क करुन त्याच्याकडून ही हत्या घडवून आणली असाही संशय आहे. नादिर शाह याची हत्या करण्यासाठी आझमगढ या ठिकाणाहून शूटर्स पाठवण्यात आले होते. हाशिम बाबा तिहार तुरुंगात आहे. तिथून समीर बाबाच्या मार्फत ही हत्या घडवण्यात आली. तिहार तुरुंगात असलेल्या समीर बाबा याने एकदा नादिरला धमकी दिली होती. मात्र, काही उपयोग झाला नाही त्यानंतर आझमगढहून शूटर्सना बोलवून नादिर शाह याची हत्या करण्यात आली, असावी अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. या पैलूच्या अनुषंगानेही पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

COMMENTS