Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्ञानदेव गायकवाड यांचे निधन

कोपरगांव प्रतिनिधीः तालुक्यातील संवत्सर येथील ज्ञानदेव उर्फ माउली कचरू गायकवाड यांचे निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 69वर्ष होते. त्यांच्या मागे

’इरसाल नमुने’ विनोदी पुस्तक वाचकप्रिय होईल ः डॉ. सुधीर तांबे
घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी झाली बालाजीरायांची व हनुमंतरायाची भेट….
महिला पोलिस उपनिरीक्षकांनी हनुमान रथाला लावला मानाचा ध्वज

कोपरगांव प्रतिनिधीः तालुक्यातील संवत्सर येथील ज्ञानदेव उर्फ माउली कचरू गायकवाड यांचे निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 69वर्ष होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. संवत्सर पोष्ट ऑफिसचे अधिकारी व जय जनार्दन फोटोचे दत्तात्रय गायकवाड यांचे ते वडील होत. कै. ज्ञानदेव गायकवाड यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे, राज्य सहकारी साखर संघाचे संचालक विवेक कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव,आदींनी शोक व्यक्त केला. त्यांच्या पार्थीवावर संवत्सर गोदातिरी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कै. ज्ञानदेव गायकवाड हे अत्यंत धार्मिक, व मनमिळावू स्वभावाने सर्वांचे परिचित होते. त्यांच्या निधनाबददल अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

COMMENTS