Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा फुले विद्यालयात गुरुकुल पालक मेळावा उत्साहात

भाळवणी ः पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील महात्मा फुले विद्यालयात गुरुकुल पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष

मित्राच्या निधनाचा धक्का पचेना, 28 वर्षांच्या तरुणाची आत्महत्या | LOKNews24
निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी : अपर जिल्हाधिकारी कोळेकर
विखेंच्या नाकाखालील डोंगर पोखरला, खासदार झाले संतप्त

भाळवणी ः पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील महात्मा फुले विद्यालयात गुरुकुल पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे सदस्य श्री. संदिप रोहोकले होते. स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य अशोक रोहोकले उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यालयात चालू असलेल्या नवीन उपक्रमांचे कौतुक केले, विद्यालयातून गेलेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून चमकत आहेत व यापुढे देश पातळीवरील स्पर्धेत मुलं चमकतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. शिस्त असेल तरच विद्यार्थी घडतात असेही ते म्हणाले.
       विद्यालयाचे प्राचार्य नाईकवाडी बी.एस. यांनी आपल्या मनोगतात संस्थेने सुरू केलेल्या गुरुकुल प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थी नुसता शैक्षणिक दृष्ट्या प्रगत होऊन उपयोग नाही तर तो समाजामध्ये शिस्तप्रिय पाल्य म्हणून घडवण्यासाठी  पालकांच्या सहकार्याची विद्यालयास आवश्यकता आहे, पालकांनी सर्व शिक्षकांवर विश्‍वास ठेवून सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी पालक मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उदमले उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्या विषयी पालकांना जागृत केले. यावेळी आदिनाथ रोहोकले, श्रीम. पोकळे पद्मा, रोहिणी रोहोकले, राजू दावभट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रोहोकले पी.एस. यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तांबोळी व आभार भालेराव यांनी मानले. मेळाव्यासाठी भाळवणी परिसरातील बहुसंख्य पालक, माजी केंद्रप्रमुख कदम, प्रभारी पर्यवेक्षक मुळे व सर्व शिक्षक उपस्थित होते.

COMMENTS