Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुरुपौर्णिमेनिर्मित्त साईचरणी 7 कोटींची गुरुदक्षिणा अर्पण

अहमदनगर/प्रतिनिधी ः शिर्डीतील साईबाबांच्या चरणी गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी भरभरून दान केले असून, या तीन दिवसीय उत्सवाच्या निमित्ताने 2 लाख साई

राहाता शहरांमध्ये स्वच्छतेसाठी नागरिकांचे ठिकठिकाणी श्रमदान
‘वाराई’च्या प्रश्नासंदर्भात व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करू नये : जिल्हाधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन
निळवंडेचा लोकार्पण कृती समितीचे आंदोलक स्थानबद्ध

अहमदनगर/प्रतिनिधी ः शिर्डीतील साईबाबांच्या चरणी गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी भरभरून दान केले असून, या तीन दिवसीय उत्सवाच्या निमित्ताने 2 लाख साई भक्तांनी दर्शन घेतले असून तब्बल 7 कोटी रुपयांचे दान देण्यात आले असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी दिली आहे.
पी. शिवा शंकर म्हणाले की, 02 जुलै ते दि.04 जुलै याकालावधीत रुपये 07 कोटी 03 लाख 57 हजार 248 प्राप्त झाली आहे. यामध्ये रोख स्वरुपात रुपये 02 कोटी 85 लाख 46 हजार 882 दक्षिणा पेटीत प्राप्त झाली असून, देणगी काऊंटर 01 कोटी 15 लाख 84 हजार 150 रुपये, साई प्रसादालय देणगी 2 लाख 84 हजार 946, पी.आर.ओ.सशुल्क पास देणगी 67 लाख 33 हजार 800, डेबीट क्रेडीट कार्ड 56 लाख 83 हजार 133, ऑनलाईन देणगी 64 लाख 05 हजार 78, चेक डी.डी.देणगी 80 लाख 74 हजार 820, मनी ऑर्डर 2 लाख 09 हजार 05, सोने 472.300 ग्रॅम रक्कम रुपये 25 लाख 72 हजार 297 व चांदी 4.679.000 ग्रॅम रक्कम रुपये 02 लाख, 63 हजार 137 यांचा समावेश आहे. श्री गुरूपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणतः 02 लाखहून अधिक साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. उत्सव कालावधीमध्ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे 01 लाख 54 हजार 946 साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत 01 लाख 88 हजार 200 साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्यात आले. या कालावधीत 37 लाख 85 हजार 800 रूपये सशुल्क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्या माध्यमातून प्राप्त झाले.

COMMENTS