मुंबई- आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना एसटी बँकेतील संचालक दणका देण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे
मुंबई– आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना एसटी बँकेतील संचालक दणका देण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे. कारण सदावर्तेंच्या एकाधिकारशाहिला कंटाळून एसटी कर्मचारी बँकेतील 15 संचालक पाठिंबा घेणार काढून घेणार असल्याचा खळबळजनक दावा माजी जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केला आहे. या संचालकांचा प्रवक्ता म्हणून बाजू मांडत असल्याचेही ते म्हणालेत.
गुणरत्न सदावर्ते यांना बँकेचे मार्गदर्शक म्हणून आम्ही स्वीकारले होते. मात्र ते आता मालक व्हायला चालले आहेत. याला आता एसटी जनसंघाने विरोध दर्शविला असून बँकेचे 19 पैकी 11 संचालक सदावर्ते यांच्या विरोधात एकवटले असल्याची माहिती एसटी कामगार नेते संतोष शिंदे यांनी दिली आहे. तसेच गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील आणि त्यांचे मेव्हणे सौरभ पाटील यांच्या वादग्रस्त कारभारावर बोट ठेवत त्यांची लवकरच हकालपट्टी करणार असल्याचेही ते म्हणाले. सदावर्ते यांनी पैसे घेऊन आणि बेकायदेशीर रित्या नोकरभरती केली असून जयश्री पाटील या मनमानी कारभार करत आहेत, असल्याचा आरोपही यावेळी केला. त्यांचे मेव्हणे सौरभ पाटील यांची सुद्धा बँकिंग क्षेत्रात कोणतेही ज्ञान नसताना त्यांची नियुक्ती बँकेच्या उच्च अधिकारीपदी नियुक्ती करून एक नवा वाद निर्माण केला आहे. याचीही चौकशी होईल असे सांगत आम्ही इतर सर्वजण जनसंघ म्हणून आता एकत्रच राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचारी बँकेतील 19 पैकी 14 संचालक नॉटरिचेबल झाल्याचीही बातमी समोर आली होती.
COMMENTS