Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुणरत्न सदावर्तेंकडून मराठा आंदोलनाविरोधात याचिका दाखल

मुंबई ः राज्यात गेल्या आठ दिवसांपासून मनोज जरांगे आरक्षणासाठी उपोषणास बसले असतांना आणि मराठा आंदोलक विविध जिल्ह्यात आंदोलन करत असतांना, अ‍ॅड. गुण

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न करावा
मोटारीच्या नंबरच्या हौसेपायी लाखोंचा खर्च
नोटबंदीचा संशयकल्लोळ

मुंबई ः राज्यात गेल्या आठ दिवसांपासून मनोज जरांगे आरक्षणासाठी उपोषणास बसले असतांना आणि मराठा आंदोलक विविध जिल्ह्यात आंदोलन करत असतांना, अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मराठा आंदोलकांनी सदावर्ते यांची गाडी फोडून आपला निषेध व्यक्त केला होता.
अ‍ॅड  गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 8 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले आहेत. जरांगे पाटलांच्या उपोषणाला राज्यभरातील मराठा बांधवांचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. जरांगेंच्या आवाहनानंतर गावागावांत आरक्षणासाठी आंदोलने होत असून राज्यात हिंसाचाराच्याही घटना घडत आहेत, याच पार्श्‍वभूमीवर ही याचिका करण्यात आली आहे. मराठा आंदोलनकर्त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर 8 नोव्हेंबरला सुनावणी होणार असून या सुनावणीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते हे वारंवार मराठा आरक्षणाला विरोध करताना दिसत असून मनोज जरांगे यांच्यावर ते सातत्याने टीका करत आहेत. या भूमिकेमुळे काही दिवसांपूर्वीच मराठा आंदोलकांनी सदावर्तेंच्या गाड्यांचीही तोडफोड केल्याची घटना घडली होती.

COMMENTS