गुलाब नबी आझादांनी सोडला काँगे्रसचा ‘हात’

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुलाब नबी आझादांनी सोडला काँगे्रसचा ‘हात’

राहुल गांधींनी पक्षातील सल्लागार यंत्रणा मोडीत काढल्याची टीका

नवी दिल्ली/प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षांपासून काँगे्रसमध्ये अंतर्गत मतभेद मोठया प्रमाणावर असल्याचे बोलले जात असून, त्यातून जी-23 नेत्यांच्या समूहाने

वीजवितरण कंपनीच्या विभागिय कार्यालयात कॉंग्रेस धडकली (Video)
देवळाली प्रवरात गुरुवारी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ
शेकडो युवक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली/प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षांपासून काँगे्रसमध्ये अंतर्गत मतभेद मोठया प्रमाणावर असल्याचे बोलले जात असून, त्यातून जी-23 नेत्यांच्या समूहाने एकत्र येत पक्षाला अध्यक्ष नसल्याची देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँगे्रस देशभर भाजपविरोधात आंदोलन उभे करणार असतांनाच काँगे्रसचे गुलाब नबी आझाद यांनी काँगे्रसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, गुलाब नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा देत, त्यांनी काँगे्रसला लिहिलेल्या पत्रात सडकून टीका केली आहे. राहुल गांधी यांनी पक्षातील सल्लागार यंत्रणा मोडीत काढत, पक्षाच्या ध्येय-धोरणांची वाट लावल्याची टीका केली आहे. राहुल गांधींमध्ये अपरिपक्वता असून त्यांनी पक्षातील सल्लागार यंत्रणा उद्धवस्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधीची वर्तवणूक बालिश असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये बदलांसाठी आग्रही जी-23 गटाचे आझाद सदस्य होते.
दरम्यान, अलीकडच्या काही महिन्यांत अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यामुळे हा काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षाचं प्राथमिक सदस्यत्वही त्यांनी सोडलं आहे. 16 ऑगस्टला त्यांनी जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आपल्या नाराजीचे संकेत दिले होते. त्यानंतर अखेर आता त्यांनी राजीनामा देत पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना चार पानांचे पत्र पाठवत राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे. राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि खासकरुन जानेवारी 2013 मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर याआधी असलेली सल्लागार यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आली असा आरोप त्यांनी पत्रात केली आहे. तसेच पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारुन कोणताही अनुभव नसणारे पक्षाचे कामकाज चालवू लागले असेही ते म्हणाले आहेत.

आझाद यांच्या पत्राची वेळ आणि त्यातील तथ्यं चुकीची ः जयराम रमेश
गुलाम नबी आझाद यांच्या पत्राची वेळ आणि त्यातील तथ्ये चुकीची आहेत, अशी प्रतिक्रिया आझाद यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे. सत्ताधारी भाजपाविरोधात काँग्रेस देशव्यापी संघटन करण्याच्या तयारीत असताना पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने राजीनामा देणे अत्यंत दुर्देवी आहे, असे रमेश यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचे माध्यमांनी प्रसिद्ध केलेले पत्र आम्ही वाचले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि संपूर्ण पक्ष सत्ताधारी भाजपाविरोधात महागाई, बेरोजगारी आणि ध्रुवीकरणाविरोधात लढाईत उतरले आहेत. 4 सप्टेंबरला ‘महंगाई पर हल्लाबोल’ हे आंदोलन आणि 7 सप्टेंबरला कन्याकुमारीतून ‘भारत जोडो’ यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असताना आझाद यांचा राजीनामा दुर्देवी आहे असे काँग्रेसने म्हटले आहे.

आझाद काढणार स्वत:चा पक्ष
काँग्रेस पक्षाचे माजी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण या सर्व चर्चांना गुलाम नबी आझाद यांनी तूर्तास पूर्णविराम दिला आहे. आपण जम्मू काश्मीरमध्ये स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याचे आझाद यांनी जाहीर केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना आझाद यांनी सांगितलं की, मी जम्मू-काश्मीरला जाणार आहे. मी राज्यात माझा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. त्यानंतर संबंधित पक्ष राष्ट्रीय स्तरावर आणण्याबाबत चाचपणी करू. आझाद यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला.

COMMENTS