Homeताज्या बातम्यासंपादकीय

श्रीमंत वाटणारे गुजरात विकसित नाही !

 गुजरात हे औद्योगिक राज्य मानले जात असले तरी, एकंदरीत केलेल्या पाहणीतून गुजरात हे श्रीमंत राज्य आहे की विकसित राज्य; हे एका पाहणीच्या आकडेवारीतून

शाहू महाराज, व्हीव्हीपॅट आणि स्पायवेअर!
देशभक्ती की, धर्मभक्ती
गांधार भूमीतील अशांततेचा वणवा

 गुजरात हे औद्योगिक राज्य मानले जात असले तरी, एकंदरीत केलेल्या पाहणीतून गुजरात हे श्रीमंत राज्य आहे की विकसित राज्य; हे एका पाहणीच्या आकडेवारीतून तुम्ही स्वतः ठरवू शकता! खरंतर, गुजरात चे दरडोई उत्पन्न भारताच्या एकूण दरडोई उत्पन्नाच्या अडीच पट अधिक आहे. अर्थात, यामध्ये कर्नाटक, तमिळनाडू, हरियाणा हे राज्य गुजरातपेक्षा आघाडीवर आहे आणि महाराष्ट्र त्या आघाडीत सामील आहे. गुजरातच्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर यामधून जरी आपण ही बाब पाहण्याचा प्रयत्न केला तर, त्यामध्ये एक प्रामुख्याने दिसतं की, गुजरातमध्ये याची वसुली उत्तम होते. मजुरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी बेरोजगारीचे प्रमाणही कमी आहे. देशाच्या १२% कारखाने म्हणजे देशाच्या एकूण कारखान्यांपैकी १२ टक्के कारखाने गुजरात मध्ये आहेत. यात पहिल्या क्रमांकावर तमिळनाडू हे राज्य आहे. जे सर्वाधिक औद्योगिक असे राज्य म्हणून आता नावारूपाला आलेले आहे. मात्र, ही आर्थिक आकडेवारी पाहत असताना, श्रीमंती एका बाजूला जरी दिसत असली तरी, प्रत्यक्षात ते विकसित आहे की नाही, हे पाहणे गंमतीने ठरेल. विकासा चे नेमके मानक काय आहेत हे जर आपण पाहायला गेलो तर, यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे दिसेल ते म्हणजे मुलींच्या जन्माचे प्रमाण गुजरातमध्ये कसे आहे, तर, यामध्ये दर १०० पुरुषांमागे ९५ एवढ्या स्त्री जन्माचे प्रमाण आहे. याचा अर्थ एकूण शंभर जन्मणाऱ्या स्त्रीभ्रूणंपैकी पाच भ्रूण हे गर्भातच नष्ट केले जात असल्याची एक सरासरी आकडेवारी पुढे आली आहे. या संदर्भात देखील अतिशय गरीब असलेल्या राजस्थान पेक्षाही ही संख्या खूप अधिक बोलकी आहे. बालमृत्यूचे प्रमाण देखील गुजरातमध्ये दरहजारी ३१.२ एवढे आहे. हे प्रमाण जवळपास राजस्थानच्या ३३ दरहजारी प्रमाणाच्या जवळपास आहे. हेच प्रमाण कर्नाटकात २५ तर तमिळनाडूमध्ये १८.६ आहे. पाच वर्षाखाली माॅर्टीलिटी रेट किंवा पाच वर्षाखालील बालक मृत्यूचे प्रमाण देखील दर हजारी २३ एवढे आहे. शिवाय, पाच वर्षाखालील बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण देखील गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. हे २५ ते ३९ टक्के एवढ्या दरम्यान ते दिसते. शिवाय, त्या पुढील आयुष्यातही कुपोषण झालेल्यांची संख्या ही मोठीच आहे; अशी आकडेवारी सांगते! पाच ते बारा वर्षाच्या दरम्यानच्या बालकांमध्ये जवळपास ७९ टक्के मुली आणि ६५ टक्के महिला या रक्ताल्पता म्हणजे ॲनिमिया या आजाराने ग्रस्त आहेत.  ही संख्या बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उडीसा आणि राजस्थान यासारख्या राज्यांप्रमाणेच आहे. गुजरात मधील ड्राॅप‌आऊट प्रमाण जरी आपण पाहिले तर सन २०२१-२२ च्या आकडेवारीनुसार पाहता गुजरातमध्ये शालेय ड्रॉप आउटचे प्रमाण गुजरात मध्ये १७.९% एवढे आहे. हे जवळपास बिहारच्या २०.५% एवढ्या ड्रॉपआऊट प्रमाणासारखेच आहे. हेच प्रमाण मध्य प्रदेश मध्ये केवळ दहा पॉईंट एक आहे तर राजस्थानमध्ये ७.७ आणि उत्तर प्रदेशात ९.७ एवढे आहे. हायस्कूलमध्ये जवळपास निम्म्या मुलींचे प्रवेश होतच नाही. म्हणजे या ठिकाणी ड्रॉप ऑऊट चे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तर, जवळपास १०० पैकी ५६ मुली या अकराव्या वर्गात प्रवेश देखील घेत नाही. अशा प्रकारची ही महिला आणि मुलींची स्थिती गुजरात मध्ये आहे. दर लाख लोकसंख्येला महाविद्यालयाचे जे प्रमाण ठरलेले आहे, त्यापेक्षा गुजरात मधील महाविद्यालयांची संख्या ही कमी आहे. ही संख्या  तमिळनाडूपेक्षा २५% ने कमी आहे; तर मध्यप्रदेश पेक्षा जवळपास २८% नी कमी आहे! अर्थात गुजरात मध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी फक्त ९.८५% मुलींचा प्रवेश होतो. ही आकडेवारी आहे, या दोन्ही आकडेवारी मधून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते की, गुजरात हे दरडोई उत्पन्नामध्ये देशाच्या वरच्या पाच राज्यांपैकी एक असलं आणि देशाच्या एकूण दरडोई उत्पन्नाचचे अडीच पट उत्पन्न गुजरातमध्ये दिसत असलं तरी एकूण सामाजिक शैक्षणिक निकषावर जर आपण गुजरातची परिस्थिती पाहिली तर गुजरात श्रीमंत असलं तरी ते विकसित नाही. त्यामुळे गुजरात विचारांनी मागासलेले आहे, ही बाब मात्र अधोरेखित होते. महिलांच्या बँक खात्यां संदर्भात जरी आपण गुजरातचची आकडेवारी पाहिली तर जनधन योजना आणि डिजिटल इंडिया नंतर ही गुजरात मध्ये फक्त ७० टक्के महिलांचीच बँक खाते उघडली गेली आहेत. तर, गुजरातच्या ४८.८ महिलांकडेच मोबाईल फोन आहे. हेच प्रमाण तमिळनाडूमध्ये ९२.२% आहे; तर, कर्नाटकामध्ये ते ८८.७% एवढे आहे. गुजरात एकूण राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या अडीच पट दरोडे उत्पन्न राखत असला तरी, व्यक्तींच्या दरडोई खर्चाचे प्रमाण जर आपण पाहिले तर गुजरात मध्ये ३७९८ आहे जे राजस्थानच्या ४२६३ रुपयांपेक्षा कमी आहे हेच प्रमाण बिहारमध्ये ३३८४ रुपये एवढे आहे तर मध्य प्रदेशात ३३११ एवढं आहे. मात्र यावर जर आपण तामिळनाडू राज्याचा विचार केला तर, तामिळनाडूमध्ये ५३१०, केरळमध्ये पाच हजार ५९२४ आणि हरियाणा मध्ये ४८५९ प्रति व्यक्ती खर्च केल्याचे स्पष्ट होते. याचा, अर्थ गुजरात हे दरडोई उत्पन्नात जरी देशात पाचवे असले तरी, व्यक्तीच्या सरासरी खर्चामध्ये ते देशाच्या इतर राज्यांच्या बरेच मागे आहे. यावरून एक निष्कर्ष स्पष्ट होतो की, गुजरात हे आर्थिक दृष्ट्या काहीसे संपन्न असले तरी, ते सामाजिक, शैक्षणिक निकषांवर मात्र विकसित राज्य ठरत नाही, ही मोठी नवलाची गोष्ट आहे!

COMMENTS