Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राण आयोजित चॅट जीपीटी आय टूल्स ह्या विषयावर श्री प्रदीप मोकळ यांचे मार्गदर्शन 

नाशिक प्रतिनिधी -  प्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ नाशिक (प्राण) या संस्थेच्या वतीने दि. २८ रोजी श्री प्रदीप मोकळ (डायरेक्टर-  हॅपीटेक इंडिया तसे

शासकीय, खासगी कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थ वापरावर बंदी
लाचखोरी! व्यवस्थेतील अपरिहार्य परंपरा……
चंदन टोळीचा सिरसाळा पोलिसांनी केला पर्दाफाश

नाशिक प्रतिनिधी –  प्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ नाशिक (प्राण) या संस्थेच्या वतीने दि. २८ रोजी श्री प्रदीप मोकळ (डायरेक्टर-  हॅपीटेक इंडिया तसेच बिज़नेस ग्रोथ कन्सल्टंट ) यांचे चॅट जीपीटी या विषया वर मार्गदर्शन झाले.   “ChatGPT” हे एक भाषा मॉडेल आहे. ज्यामुळे तुमच्या प्रश्नांना उत्तरे मीळू शकतात आणि काही माहिती प्रदान करू शकतात.

चॅट जीपीटी AI टूल्स चे रियल एस्टेट क्षेत्रात  होणारे फायदे या विषया वर त्यानी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्राण संस्थेचे अध्यक्ष श्री. विक्रांत आव्हाड यांनी सभासदांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, याचाच एक भाग म्हणून आजचे व्याख्यान होत आहे.

हया मार्गदर्शनपर कार्यक्रमाचा सर्व रियल इस्टेट कन्सल्टंटस् व इतर रियल एस्टेट व्यावसायिकांनी लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे सल्लागार डी.जे धामणे व राजेंद्र कोटकर तसेच मंथ इवेंट 

को-ऑर्डिनेटर गिरीश विजन , उपाध्यक्ष्य प्रदिप रणधीर, सेक्रेटरी नितीन कोटकर, जॉईंट सेक्रेटरी राज तलरेजा, खजिनदार कैलास कदम, नितिन जांगडा,योगेश नेरकर, अमित वाघ, संजय दुसे, निलेश येवले, श्रीरंग भदाणे,यश शहा, क्षितीज दंडगव्हाळ, प्रकाश कठपाल,जगदीश बंग, मनीष शहा,रवी सूर्यवंशी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीश्रम घेतले. कार्यक्रमा साठी प्राण मेंबर्स व इतर मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते. गिरीश विजन यांनी प्रदीप मोकळ यांचा परिचय करुन दिला. सूत्र संचालन यश शाह यांनी केले व नितीन कोतकर यांनी आभार प्रदर्शन केले.

COMMENTS