Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यात नवीन फौजदारी कायदेविषयी मार्गदर्शन शिबीर उत्साहात

श्रीगोंदा : तालुका विधी सेवा समिती श्रीगोंदा व पोलीस उपविभागीय कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 12 रोजी छत्रपती संभाजी महाराज सभ

अहमदनगरच्या राहता तालुक्यात ट्रकचा भीषण अपघात
रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालिका दिनाचे नेत्रदीपक साजरीकरण
दहावीच्या परीक्षेत प्रवरेच्या 14 शाळाचा शंभर टक्के निकाल

श्रीगोंदा : तालुका विधी सेवा समिती श्रीगोंदा व पोलीस उपविभागीय कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 12 रोजी छत्रपती संभाजी महाराज सभागृह पंचायत समिती श्रीगोंदा येथे नवीन कायदे विषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश -1 मुजीब शेख हे होते.
या कार्यक्रमामध्ये भारतीय न्याय संहिता -2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता -2023, भारतीय साक्ष अधिनियम -2023 या नवीन कायद्या विषयक माहिती देण्यात आली तसेच इतरही कायदे विषयक मार्गदर्शन करताना कायद्यातील नियमानुसार पोलिसांनी कशी कार्यवाही करावी या गोष्टींची माहिती देण्यात आली. पोलीस तपासातील येणार्‍या समस्यांवर कायदे विषय सखोल माहिती व बारकावे यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते जिल्हा व सत्र न्यायाधीश -1 श्रीगोंदा मुजीब शेख, अतिरिक्त मुख्य न्यायदांडाधिकारी श्रीगोंदा जी.एम.साधले, अतिरिक्त मुख्य न्यायदांडाधिकारी श्रीगोंदा एच. जे. पठाण यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. पोलिस अधिकार्‍यांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. प्रश्‍नोत्तराद्वारे विविध विषयांवर चर्चा झाली. या कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायाधीश श्रीगोंदा डी. पी. शिंगाडे, दिवाणी न्यायाधीश व स्तर श्रीगोंदा एस. पी. केकाण, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे, श्रीगोंदा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलिस उपविभागीय कार्यालय कर्जत यांच्या कार्यक्षेत्रातील पोलिस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिस, तपासी अधिकारी, अंमलदार हावलदार यांना भारतीय न्याय संहिता -2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता-2023, भारतीय साक्ष अधिनियम-2023 या नवीन कायद्या विषयक माहिती  तसेच इतरही कायदे विषयक माहिती होऊन कायद्यातील नियमानुसार कारवाई करता यावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलिस अधिकारी, कर्जत विभाग

COMMENTS