Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता येथे स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊंना अभिवादन  

रहाता : येथील श्री सद्गुरू नारायणगिरीजी महाराज शासकीय आयटीआय मध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक

राहाता महाविद्यालयात  स्नेहसंमेलन उत्साहात
राहात्यात कोंबडीच्या आमिषाने बिबट्या जेरबंद
डॉ. पुंडलिक राहात्याचे उपनगराध्यक्ष 

रहाता : येथील श्री सद्गुरू नारायणगिरीजी महाराज शासकीय आयटीआय मध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते योगेश कुमावत यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार तसेच राजमाता जिजाऊ यांच्या राष्ट्रउभारणीतील योगदान यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप शिरसाठ सर होते. त्यांनी विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये, शिस्त व राष्ट्रभक्तीचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पवार यांनी केले. संस्थेचे प्राचार्य नितीन कुलकर्णी यांनी आभार मानले.या कार्यक्रमास आय.टी.आय कर्मचारी वृंद तसेच डॉ. के. वाय. गाडेकर हायस्कूल शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती. शिक्षकवर्ग व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS