Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

पाथर्डी :   पाथर्डी तालुक्यातील येळी येथील महात्मा गांधी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 295 जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आल

पाथर्डीत हर्षवर्धन सपकाळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
योग्य शिक्षण मिळणे हाच यशाचा मार्ग ः डॉ. वंदना मुरकुटे
नगरसेविका वंदना टेकेंच्या अपात्रतेची सुनावणी २० तारखेला

पाथर्डी :   पाथर्डी तालुक्यातील येळी येथील महात्मा गांधी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 295 जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक विठ्ठल बरसमवाड उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य मच्छिंद्र गोसावी व कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र कुमार शिरसाट यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सर्व समाज घटकातील वंचित महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य सावित्रीबाई फुलेंनी केले. त्यांच्यामुळेच आज महिला सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर आहेत. खरोखर त्यांनी विद्येचे महत्त्व जाणले होते.असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक विठ्ठल बरसमवाड यांनी यावेळी केले. विद्यालयातील अनेक मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. त्या सर्वांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्या निमित्ताने रांगोळी,निबंध,हस्ताक्षर स्पर्धा, शालेय स्वच्छता असे वेगवेगळे उपक्रम घेऊन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मच्छिंद्र गोसावी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर अध्यक्षांनी त्यांचे शैक्षणिक कार्य सांगितले. यावेळी कराड ज्ञानेश्वरी. फुंदे माधुरी,अश्विनी बडे, कार्तिकी बडे, पाखरे स्नेहल,ढोले धनश्री, घुले कार्तिकी, शेख मुस्कान या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यालयातील अर्जुन गायकवाड, विजयकुमार चव्हाण, रामनाथ दुधलमल, सिकंदर शेख, महेंद्र कुमार शिरसाट  पोपट शेलार, प्रदीप ढोले, डावखर, अर्चना, कराड अर्चना, तळेकर अनिता व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार चव्हाण यांनी तर सिकंदर शेख यांनी आभार मानले.

COMMENTS