Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरडा दुष्काळ जाहीर करून पीक विमा मंजूर करा

चाकूर प्रतिनिधी - चाकूर तालुक्यात सध्या पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप पिके शेतात वाळून जात आहेत. शेतक-यांंना तात्काळ खरीप विमा मंजूर करण्यात यावा,

बागुलबुवा १२७ जागांचा !
दिव्यांग व ज्येष्ठांना केंद्राने दिला आधार : मंत्री डॉ. विरेंद्रकुमार यांचे प्रतिपादन
उड्डाणपुलाखालील वाहतुक सुरळीत होण्यासाठी ‘सिग्नल’ सुरु करावेत

चाकूर प्रतिनिधी – चाकूर तालुक्यात सध्या पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप पिके शेतात वाळून जात आहेत. शेतक-यांंना तात्काळ खरीप विमा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय युवक कॉग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. चाकूर तालुक्यात मागील 27-28 दिवसांपासून पाऊस झाला नाही पावसाअभावी शेतातील पिके वाळून जात आहेत. पावसाअभावी 50 टक्के उत्पादन घटले आहे. अशा स्थितीत सरकार म्हणून कोणतेही नेते याची दखल घेत नाहीत. तसेच विमा कंपनीकिंवा तहसील यांच्या कडूनही अद्याप पर्यंत कसल्याही प्रकारची मदत होताना दिसत नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनांवर निलेश देशमुख, शेख पप्पूभाई, तांबोळी सलीमभाई, शिंदे प्रशांत, भोसले बाळासाहेब, जाधव मोहन, अनारुपे सचिन,भागवत सूर्यवंशी, नितीन सूर्यवंशी, शिवानंद स्वामी,शिवकुमार गादगे, प्रशांत धनशेट्टी, लिंबराज गरड, भरत रेड्डी, ज्ञानेश्वर गोमसाळे, आयनुले नरिंसग, सय्यद गौस, भोसले रामेश्वर,जाधव रविकांत, उजळंबे बळीराम, दिगंबर माळी, खादर धानोरे, रंजीत पाटील, शरद जाधव, बुद्धभूषण पाटोळे, शेख शिराज,शेख अलीम, शेख असिफ, सचिन चाकूरकर, कांबळे आनंद, सोळुंके अरिंवद, रोशन शेख, महादेव शिंदे, केशव सोनवणे, बबलू झांबरे आदी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS