रोहा : मालमत्तेच्या हव्यासापोटी नातवानेच धामणसई आदिवासी वाडीवरील लक्ष्मी रामा वाघमारे (वय ६०) या आपल्या आजीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. रोह

रोहा : मालमत्तेच्या हव्यासापोटी नातवानेच धामणसई आदिवासी वाडीवरील लक्ष्मी रामा वाघमारे (वय ६०) या आपल्या आजीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. रोहा पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत २४ तासांत आरोपीला गजाआड केले. शांताराम पांडुरंग जाधव (वय २४) असे अटक आरोपीचे नाव आहे. याबाबत अंकुश रामा वाघमारे यांनी फिर्याद दिली होती.मालमत्तेच्या हव्यासापोटी आरोपीने लक्ष्मी वाघमारे यांचा दगडाने ठेचून खून केला होता. घटनास्थळी प्रथमदर्शनी कुठलाही पुरावा नसताना कौशल्यपूर्ण तपास करीत पोलिसांनी आरोपीला २४ तासांत अटक केली. अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे आणि पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी खुनाच्या तपासासाठी पोलिसांची ५ तपास पथके तैनात केली होती. कोलाड रेल्वे गेटवरील कर्मचाऱ्याच्या खुनाचा तपास लावण्यात यशस्वी ठरलेले रोहा पोलिस प्रशासन धामणसई येथील खुनाचा २४ तासांतच तपास लावण्यात यशस्वी ठरल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
COMMENTS