Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतमीचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणारा पोलिसांच्या ताब्यात

पुणे- "सबसे कातिल गौतमी पाटील"ची महाराष्ट्र सर्वत्र क्रेज आहे. मुलाचं बारस, गावची जत्रा किंवा कोणत्याही कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलच पाहिजे अ

जिल्हा अनलॉक कायम, व्यवहार सुरू राहणार ; दुसर्‍या आठवड्यातही जिल्हा प्रथम स्तरमध्येच
अंतिम घटकांपर्यंत पोहचा; `नागरिक देवो भव’ म्हणा!
राजधानीत भूकंपाचे तीव्र धक्के

पुणे- “सबसे कातिल गौतमी पाटील”ची महाराष्ट्र सर्वत्र क्रेज आहे. मुलाचं बारस, गावची जत्रा किंवा कोणत्याही कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलच पाहिजे असं सगळ्यांचं मत असतं. त्यात गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा होतच असतो. पण गेल्या काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान गौतमी कपडे बदलत असताना ते शूट करुन त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. आता पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत गुन्हा नोंद केला आहे. 24 फेब्रुवारीला कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तीने गौतमी पाटीलचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.  त्यानंतर गौतमी पाटीलच्या अन्य सहकाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी गौतमी पाटील सोबत डान्स करणाऱ्या एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली  आता याप्रकरणी एक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. गौतमीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंदवण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलं होतं.

COMMENTS