Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकार कोसळण्याचे भाकीत हास्यास्पद – बावनकुळे

अकोला/प्रतिनिधी ः धनुष्यबाण आणि शिवसेना नेमकी कुणाची यावर सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निर्णय प्रलंबित असला तरी, महाविकास आघाडीच्या नेत्

जागा वाटपांवरुन खा. राहुल गांधी नाराज
राजकीय वादळाचा अर्थ!
गावाच्या बाहेर कचरा टाकण्यासाठी ग्रामस्थांची मागणी

अकोला/प्रतिनिधी ः धनुष्यबाण आणि शिवसेना नेमकी कुणाची यावर सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निर्णय प्रलंबित असला तरी, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याच्या तारखा जाहीर करण्यात येत आहे. याचा रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला. शिंदे-फडणवीस सरकार 14 फेब्रुवारीपर्यंत कोसळेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले भाकित हास्यास्पद असल्याचा टोला बावनकुळे यांनी लगावाला. ते रविवारी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत अकोल्यात आले असता माध्यमांशी बोलत होते.
शिंदे-फडणवीस सरकार बहुमताचा आकडा 164 वरून 184 असे पार करेल, असाही दावा त्यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आम्ही दोन वेळा एकूण 288 आमदार असलेल्या विधानसभेत 164 चा आकडा पार केला होता. एकदा विश्‍वास प्रस्तावावेळी तर काँग्रेसचे 10 आमदार गैरहजर होते. त्यानंतर यानंतर पुन्हा विश्‍वास मताची वेळ असल्यास शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने असलेल्या आमदारांची संख्या 184 पर्यंत पोहोचेल. बीडमधील व्हिडिओवरूनही भाजप प्रदेशाध्यक्षांनी विरोधकांना सुनावले. पंकजा मुंडे या राष्ट्रीय नेत्या असून, त्यांच्याबाबत सर्वांनाच आदर आहे. मात्र, त्यांच्याविरोधात विरोधकांची टिम षडयंत्र रचत असून, चुकीच्या बाबी पसविण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील 50 आमदार केव्हा गेले, हे माहीतही पडले नाही. आता 10 आमदार केव्हा जातील, हेही समजणार नाही. महाविकास आघाडीतील आमदारांना हुकुमशाहीच्या पद्धतीने वागणूक देण्यात येत असून, आताच्या काळात कोणत्याच पक्षात हुकुमशाही नको. सकाळी उठून सुरू होणारा भोंगा कोणालाच पसंत नाही. असा टोला बावनकुळे यांनी थेट नाव न घेता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावला.

COMMENTS