श्रीगोंदा : महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विलास येळवंडे व कोषाध्यक्षा श्रीमती शैलजा घुले यांच्या उपस्थितीत नुकतीच महाराष्ट्र योग शिक्
श्रीगोंदा : महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विलास येळवंडे व कोषाध्यक्षा श्रीमती शैलजा घुले यांच्या उपस्थितीत नुकतीच महाराष्ट्र योग शिक्षक संघाची श्रीगोंदा तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली. श्रीगोंदा तालुका योग शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी गोविंद हिरवे तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब साबळे यांची तर अशोक बोरुडे सचिव, बाळासाहेब काळे सहसचिव, बाळासाहेब मोहरे कोषाध्यक्ष, राणी डांगे महिला प्रकोष्ट प्रभारी, इंद्रभान बोरुडे सोशल मीडिया प्रमुख, शिवाजी पांडव संयुक्त सचिव, संतोष भोर कार्यालय सचिव, खंडू हिरवे विशेष निमंत्रित, तुळशीराम हिरवे लीगल सेल प्रभारी, नामदेव धालवडे संघटन, सचिव शिवाजी नवले संयुक्त सचिव अशी निवड करण्यात आली. योगाचे हे महान कार्य संपूर्णपणे जबाबदारीने सर्वजण पार पाडतात गेली 16 वर्ष योगाचे अखंडपणे प्रचार व प्रसार करण्याचे काम चालू आहे रोज सकाळी पहाटे साडेपाच ते सात योगा प्राणायामाचा वर्ग पारगाव सुद्रिक येथे सातत्याने चालू आहे तसेच त्याचे ऑनलाईन प्रक्षेपण दररोज सकाळी योग साधना ग्रुप श्रीगोंदा या युट्युब चॅनल द्वारे चालू असते. यावेळी जिल्हाध्यक्ष विलास यळवंडे व कोषाध्यक्षा श्रीमती शैलजा घुले यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
COMMENTS