Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यपाल भवन हे ’भाजप भवन’ झाले होते – नाना पटोले

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर

धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत करावा
राज्यात दुष्काळ जाहीर करा ः सुप्रिया सुळे
विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर राज्यभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ’राज्यपाल भवन हे ’भाजप भवन’ झाले होते, महाराष्ट्र पापातून मुक्त झाला, अशा शब्दात नाना पटोलेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

नाना पटोले म्हणाले की भाजपने राज्यपालांकडून जेवढी बदनामी करून घ्यायची होती तेवढी बदनामी करून घेतली. महापुरुषांबाबत टिंगल आणि वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल करत होते. भारतीय जनता पार्टीने राज्याची बदनामी करण्यासाठी मुद्दाम असे राज्यपाल बसवले होते. राज्यपालांनी केलेल्या अपमानाचा बदला महाराष्ट्र कसा घेईल, असेही पटोले म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी म्हटलेले ’देर आये दुरुस्त आये’ हे वाक्य राज्यपालांच्या या घटनेत लागू होत नाही, असेही पटोले म्हणाले. राज्यात नवीन सरकार बनवण्याबाबत कोणतेही निमंत्रण पत्र दिले नव्हते ही बाब माहितीच्या अधिकारात पुढे आली आहे, असा दावा देखील पटोले यांनी यावेळी केला. नवीन राज्यपालांकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान वाढावा अशी अपेक्षा आहे. काँग्रेस रमेश बैस यांच्यासोबत आहे, असेही ते म्हणाले. पुण्यात पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना प्रचाराला यावे लागते याचाच अर्थ भाजप बाबत जनतेत अविश्‍वास निर्माण झाला आहे. अमित शहा यांना पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी यावे लागते यापेक्षा मोठे  दुर्दैव कोणतच नाही, अशी टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली.

COMMENTS