Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय कार्यालये आज बंद करण्याचा खा. लंके यांचा इशारा

अहमदनगर ः दूध आणि कांदा प्रश्‍नांवर खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाच्या रविवारी, तिसर्‍या

सत्तेची हवा डोक्यात गेलेल्यांना जनता धडा शिकवते ः खासदार लंके
सत्तेची हवा डोक्यात गेलेल्यांना जनता धडा शिकवते ः खासदार लंके
मांडवगणमध्ये खासदार निलेश लंके यांचा नागरी सत्कार

अहमदनगर ः दूध आणि कांदा प्रश्‍नांवर खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाच्या रविवारी, तिसर्‍या दिवशी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी शेतकर्‍यांनी नगर शहरातून काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमुळे चक्का जाम होऊन वाहतूकीची कोंडी झाली. यावेळी आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी शासकीय कार्यालये आज सोमवारी बंद करण्याचा इशाराही खासदार लंके यांच्याकडून देण्यात आला आहे. रविवारी मेहबूब शेख, प्रभावती घोगरे, राहुल जगताप, भानुदास मुरकुटे, घनश्याम शेलार, अरूण कडू, साहेबराव दरेकर, गोविंद मोकाते यांच्यासह जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील नेतेमंडळींनी आंदोलस्थळी हजेरी लावत पाठींबा दर्शविला. रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर रॅलीस सुरूवात झाली. खा. नीलेश लंके हे स्वतः ट्रॅक्टर चालवत या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीमध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता. दरम्यान, विशेषतः रविवारी सकाळी ट्रॅक्टर नगरकडे निघाल्याने नगर-पुणे व नगर-कल्याण महामार्गावरही वाहतुकीची कोंडी झाली होती. 

COMMENTS