Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आईवडिलांमुळे प्रथम क्रमांक मिळाला ः कु. अश्‍विनी काळे

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः मी एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात दूर शेतीमातीच्या मळ्यातील घरात राहून अभ्यास केला. प्रथमपासूनच आजी, आजोबा, आई, वडील, चुलती,

Ahmednagar : अमोल मिटकरी, माफी मागा अन्यथा शहरात एकही कार्यक्रम घेऊ देणार नाही… मनसेचा इशारा l LokNews24
राजकीय पक्षांच्या ऑफर धुडकावत सामाजिक कामांनाच महत्व दिले : पोपटराव पवार
अहमदनगर जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरु करण्याची मागणी

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः मी एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात दूर शेतीमातीच्या मळ्यातील घरात राहून अभ्यास केला. प्रथमपासूनच आजी, आजोबा, आई, वडील, चुलती, चुलता घरातील सर्वांनी सहकार्य केले. एकदा वाचले तरी मला ते पाठ होते, लक्षात राहते, आई, वडिलांना शिक्षणातले फारसे कळत नव्हते तरी त्यांच्यामुळेच मी 12 वी शास्त्र शाखेत महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला, असे भावपूर्ण उदगार कु. अश्‍विनी पोपटराव काळे यांनी काढले.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शेतशिवारातील कु. अश्‍विनी पोपटराव काळे हिने रयत शिक्षण संस्थेच्या रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयातील 12वी विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. 89:67टक्के गुण मिळवून एका सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी मुलीने असे यश मिळविल्याबद्दल कु.अश्‍विनी काळे हिचा  सत्कार माजी प्राचार्य टी. ई. शेळके, साहित्यिक व ’रयत’चे माजी मॅनेजिंग कॉन्सिल सदस्य डॉ. बाबुराव उपाध्ये, विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, स्वाध्याय परिवाराचे माजी प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे यांनी शाल, बुके, पुस्तके, पेढे  देऊन सन्मान केला. सुखदेव सुकळे यांनी स्व. पुष्पाताई सुकळे स्मृतीप्रीत्यर्थ 1111 रुपये कु. अश्‍विनी काळे यांना बक्षीस दिले, त्याप्रसंगी ती बोलत होती.यावेळी आजोबा बबनराव काळे, आजी परिगाबाई काळे, आई सौ. पुष्पाताई काळे, वडील पोपटराव काळे, चुलती मनीषाताई काळे, चुलते ज्ञानेश्‍वर काळे, बहीण कु. गौरी काळे,चि. कृष्णा ज्ञानेश्‍वर काळे, कृष्णा संजय दरेकर, सिंकदर शेख आदी उपस्थित होते.शेतमळ्यात राहून आईवडिलाबरोबर शेतीत, गाई, गुरं सांभाळत कु.अश्‍विनी काळे हिने मिळविलेले यश कौतुकास्पद असल्याचे मत प्राचार्य शेळके, डॉ. उपाध्ये, डॉ. गागरे, सुकळेसर यांनी व्यक्त करून सर्व  कुटुंबाचा सन्मान केला. आई, वडील, आजी, आजोबा,चुलते,चुलती यांनीही  आपल्या आनंददायक भावना व्यक्त केल्या. प्राचार्य शेळके यांनी सांगितले की, संयुक्त शेतकरी काळे कुटुंबाचा असा आदर्श घेतला पाहिजे. प्रत्येक शेतकरी मुलामुलींनी असे यश मिळविले पाहिजे,गरिबांची मुले, खेड्यातील मुले,मुलीच शेतकरी, कष्टकरी वर्गाचे भले करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कु. अश्‍विनी काळे हिची मुलाखत घेतली.घरातील सर्वांशी संवाद साधला. सूत्रसंचालन केले. पोपटराव काळे यांनी सर्वांचे आभार मानले.

COMMENTS