Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाणे, नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

नवी मुंबई प्रतिनिधी - ठाणे - वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर दिघा या नव्या रेल्वे स्थानकाची भर पडणार आहे. ठाणे ते ऐरोली स्थानकांदरम्यान दि

तीर्थक्षेत्र विकासांच्या 305 कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
मोहा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात

नवी मुंबई प्रतिनिधी – ठाणे – वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर दिघा या नव्या रेल्वे स्थानकाची भर पडणार आहे. ठाणे ते ऐरोली स्थानकांदरम्यान दिघा हे स्थानक उभारण्यात आले असून, लवकरच त्याचं उद्घाटन होणार आहे. ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकाचे काम प्रगतिपथावर असून ८०% काम झाले आहे.  दिघा रेल्वे स्थानक लोकल थांब्यासाठी सज्ज झाले असून चाकरमानी, प्रवासी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. आमदार गणेश नाईक यांनी दिघा रेल्वे स्टेशनची आज अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली आहे. दिघा परिसरात मोठी लोकवस्ती असून, तिथे आयटी कंपन्या ही आल्या आहेत. पण या स्थानकावर आजवर ट्रेन थांबत नव्हती. त्यामुळं रहिवाशी आणि नोकरदारांना ठाण्याला येण्यासाठी रिक्षा किंवा बसचा वापर करावा लागत होता. तसंच दिघा एमआयडीसीमध्ये  येणाऱ्या कामगार वर्गाला ऐरोली स्थानकात उतरावं लागत होते. 

COMMENTS