Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायतीमधून गोधड्याचा पाडा ही नविन ग्रामपंचायत स्थापना

नाशिक - ग्राम विकास विभागाच्या शासन अधिसुचना दि. 30 जून 2023 अन्वये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाधेरे ग्रामपंचायतीमधुन गोधड्याचा

सागरेश्‍वरमधील वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी बैठक; आंदोलन स्थगित
आसाममध्ये भारत न्याय जोडो यात्रेदरम्यान गोंधळ
कंपनीच्या ट्रेलरने एका कामगाराला दिली धडक, घटना सीसीटीव्हीत कैद…

नाशिक – ग्राम विकास विभागाच्या शासन अधिसुचना दि. 30 जून 2023 अन्वये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाधेरे ग्रामपंचायतीमधुन गोधड्याचा पाडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली आहे. त्यानुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यात 84 ऐवजी 85 व नाशिक जिल्हा परिषदेमध्ये 1387 ऐवजी 1388 ग्रामपंचायती झाल्या आहेत. सदर ग्रामपंचायत स्थापन होणेबाबत सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य व इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार श्री. हिरामण खोसकर यांची मागणी व पाठपुरावा चालु होता.

ग्राम विकास विभाग, शासन निर्णय दि. 12 फेब्रुवारी 2004 व शासन परिपत्रक दि. 02 सप्टेंबर 2006 नुसार तसेच वाघेरे येथील ग्रामसभा दि. 26.11.2021 नुसार वाघेरा ग्रामपंचायतीचे विभाजन करुन गोधड्याचा पाडा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत ठराव करण्यात आला होता व याबाबत गट विकास अधिकारी, पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांचेकडुन शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर नाशिक जिल्हा परिषद, स्थायी समिती दि. 12 सप्टेंबर 2022 नुसार स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर सदर प्रस्ताव मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांना सादर करण्यात आला, मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांचेमार्फत शिफारशीने प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला. राज्य शासनाच्या दि. 30 जून 2023 रोजीच्या शासन अधिसुचनेद्वारे गोधड्याचा पाडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन केली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकुण 85 ग्रामपंचायती स्थापन झाल्या आहेत. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्यामुळे स्वतंत्र कार्यकारिणी, ग्रामपंचायत कार्यालय, 15 वा वित्त आयोग व पेसा निधी स्वतंत्रपणे मिळणार आहे. सदर नविन ग्रामपंचायत स्थापनेमध्ये वाघेरे गोधड्याचा पाडा यांच्या कार्यकारिणी, मत्ता व दायित्व तसेच इतर कामकाज याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे यावर्षी नाशिक तालुक्यातील गंगाम्हाळुंगी या ग्रामपंचायतीमधुन सुभाषनगर, बागलाण तालुक्यातील केळझर या ग्रामपंचायतीमधुन तताणी, व येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी या ग्रामपंचायतीमधुन लौकी शिरस अशा तीन ग्रामपंचायती स्थापन झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी दिली.

“त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायतीमधुन गोधड्याचा पाडा हि स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यामुळे गोधड्याचा पाडा या गावाला शासनाच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देणे आता शक्य होणार आहे व ही ग्रामपंचायत स्थापन झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या 1388 इतकी झाली आहे.

COMMENTS