Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातार्‍याजवळ गोवा बनावटीची 85 लाखांची दारू जप्त; दोघांना अटक

सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्यातील बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत गोवा बनावटीची ट्रकभरून निघालेली दारू सातारा पोलिसांनी जप्त केली. तब्बल 85

गव्याच्या हल्ल्यातील वृध्दाचा अखेर मृत्यू
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात; अटकेची कारवाई सुरू
यंदा रायगडी घुमणार राजधानीचा आवाज; राज्यभिषेक कलशाचे विधीवत पूजनास शिवभक्तांची उपस्थिती

सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्यातील बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत गोवा बनावटीची ट्रकभरून निघालेली दारू सातारा पोलिसांनी जप्त केली. तब्बल 85 लाखांची ही दारू असून, याप्रकरणी सचिन विजय जाधव (रा. आळसंद, ता. खानापूर, जि. सांगली), जमीर हरुण पटेल (रा. आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 29 एप्रिल रोजी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला (एलसीबी) एका ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूच्या वाहतुकीची माहिती मिळाली. त्यानुसार सातारा एलसीबी, उत्पादन शुल्क व बोरगाव पोलिसांचे पथक तयार केले. हे पथक बोरगाव गावच्या हद्दीतील सर्व्हिस रोडवर उरमोडी नदीजवळ दबा धरुन होते. मंगळवारी पहाटे 3.10 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संबंधित ट्रक थांबवून पाहणी केली असता गोवा बनावटीच्या वेगवेगळ्या कंपनीची दारु मिळाली.
पोलिस, उत्पादन शुल्क विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला असता दारुची किंमत अंदाजे 84 लाख 41 हजार 40 रुपये एवढी होती. याशिवाय ट्रक असा सर्व मुद्देमाल 1 कोटी 11 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

COMMENTS